लांडी लबाडीने 2 नंबरचा पैसा मिळवणाऱ्यांचा शेवट कसा होतो?…

0
53

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,

कलियुगात लोक लांडी लबाडी करून दुसऱ्याचा पैसा हडपतात. पैसा, मालमत्ता हडपतात. यांच्यासाठी देव काय न्याय करतो. असे लोक सुरुवातीच्या काळात मौज मजा करतात.

पण शेवटी अत्यंत वाईट परिस्थिती अशा लोकांच्या वाट्याला येते. यांची संतती वाईट निपाजतात. वाम मार्गाला लागतात व्यसनी होतात. अशा गुन्हा मध्ये अडकतात की जे गुन्हे समाजात तिरस्कृत नजरेने पाहिले जाते.

शेवटी अशा व्याधी होतात की शरीर जीव सोडावा म्हटलं तरी जाता जात नाही. वेदना खूप होतात. अशा लोकांच्या घरात भांडणे खूप होतात. जवळचे लोक सोडून जातात.

अगदी पत्नी सुद्धा शेवट सोडून जाते. सुख, शांती राहत नाही. जो पैसा लांडि लबाडीने कमावला आहे तो देखील राहत नाही. मग त्यावर हे लोक अनेक प्रकारचे जोतिष उपाय करतात. सुख, शांती यावी पैशाचा उपभोग घेता यावा.

किती उपाय केला तरी काही उपयोग होत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्या घरात जे अन्न आहे त्याचा कधी अपमान होणार नाही. आपल अन्न वाया जाणार नाही याची प्रत्येक जणांनी कटाक्षाने काळजी घ्यावी.

अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवी चा अपमान आहे. आपण भरपूर प्रमाणत जेवण बनवतो आणि तो उरतो ते अन्न पशु पक्षी, प्राण्यांना घाला. त्याला शीळ होऊ देऊ नका.

शीळ अन्न खाल्ल्याने आपल आरोग्य बिघडत हे शीळ अन्न अपायकारक असते. थोडक्यात पोटात जाऊन सुध्दा त्या अन्नाचा अपव्यय होतो. म्हणून स्वयंपाक हा प्रमाणातच बनवावा.

ज्या घरात अन्न वाया जात त्या घरावर अन्नपूर्णा देवी चा कोप होतो. त्या घरात दारिद्र्य, अनारोग्य हे दोन रा राक्षस प्रवेश करतात. अन्न पोटातून वाया जाणार नाही.

<
आणि बाहेरून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. अन्नपूर्णा देवी च्या कृपेने आपल्या घरात सुख, सुबत्ता, धनधान्य टिकून राहील. आजच्या लेखाचा उद्देश आपण सद्मार्गाने वागावे हा होता.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here