नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो श्रावण महिन्यात तांदळाचे अतिशय महत्व आहे, हेच तांदूळ मंगल कार्यात अक्षत म्हणून ओळखले जातात. पूजाच्या सामग्रीमध्ये तांदळाचा अक्षत म्हणून समावेश केला जातो.
मित्रांनो तांदळाच्या अनेक उपायांचा उल्लेख शास्त्रात करण्यात आला आहे, जेणेकरून एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर विजय मिळवू शकते. शास्त्रात ज्योतिष शास्त्रालाही महत्त्व दिले गेले आहे. यामध्ये तांदळाशी संबंधित असे अनेक उपाय आहेत जे वेगवेगळ्या समस्यांशी संबंधित आहेत.
या उपायाने गरिबी पासून मुक्त होण्यासाठी या गोष्टींचा वापर करणे खूप सोपे आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणींपासून सहजतेने मुक्त होउ शकते.
मित्रांनो शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रानुसार शिवलिंगावरती वाहायला बऱ्याच गोष्टी व त्यांचे नियम सांगितले आहेत. त्यामुळे तुमचं जीवन सफल होईल. सर्व गोष्टी, इच्छा पूर्ण होतील.
पवित्र श्रावण महिन्यात पूर्ण एक महिना सकाळी स्नान करून पायात चप्पल न घालता हा उपाय करा. अनवाणी पायाने जवळच्या शिवमंदिरात जावे. तसेच तिथे जाऊन तुम्ही हा प्रभावी उपाय करावा.
21 अखंड तांदूळ जे तुटलेले, फुटलेले नसतील असे तांदूळ तुम्ही मोजून घ्या. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन शिवलिंगासमोर बसावे व त्यानंतर यातील एक एक तांदूळ अक्षता म्हणून शिवाला वहावा.
मित्रांनो असे करताना तुम्ही मनात भलते सलते विचार आणू नका. मन पूर्ण शुद्ध ठेवावे. मनात फक्त शिवनाम ठेवावे. तसेच तुमच्या मनातील इच्छा लगेच देवाला न सांगता प्रथम मनोभावे पूजा, प्रार्थना करावी. एक एक अक्षता वाहताना तुम्ही हा मंत्रजप करावा. या मंत्राचा जप तुम्ही तिथे अक्षता वाहताना करायचा आहे.
अक्षता म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये. हा जप आपलं तन मन शुद्ध करतो. अवघा विश्व व्यापक असा हा मंत्र आहे. या मंत्राचे खूप महत्व देवी देवतांनी सांगितले आहे.
मित्रांनो आपलं जीवन सफल होण्यासाठी, अडचणींचा सामना करण्यासाठी आपण महादेवाची भक्ती करावी, महादेव आपल्याला बळ देतात, तसेच थोड्याशा केलेल्या पूजेने ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात. तसेच आपलं जीवन त्यामुळे सुखकर होते. मित्रांनो हा पवित्र मंत्र आहे
ओम शिवाय नमः
या मंत्राचा प्रत्येक तांदूळ वाहताना उच्चार करा. असा 21 वेळा करावा. त्यानंतर परत शिवाला नमस्कार करा व त्यामुळे तुमचं शरीर, मन पवित्र होईल. तसेच हा उपाय सलग रोज करत रहा. तुम्हाला प्रचिती नक्की येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.