नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अमावास्येला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या होय. अमावस्या म्हणजे पितरांचा दिवस मानला जातो. काही कुटुंबात या दिवशी खीरपुरीचा किंवा गोडाचा नैवेद्य पितरांना दाखवला जातो.
मित्रांनो या दिवशी आकाशात चंद्र नसल्याने सगळीकडे किर्र काळोख पसरला असतो. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी दान केल्याने पितृ दोष, छाया दोष तसेच मान सि क समस्या ही दूर होतात.
आज आपण अमावस्येच्या दिवशी करायचे असे काही उपाय बघणार आहोत, की त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समाधान तर येईलच पण माता लक्ष्मीची ची कृपा बरसेल.
मित्रांनो एक कोरडा नारळ घेऊन त्याला छोटेसे छिद्र करावे आणि पीठ व पिठी साखर मिक्स करून पूर्ण नारळ त्या मिश्रणाने भरून घ्यावा. असे नारळ निर्जन ठिकाणि जिथे खूप मुंग्या असतील तेथे पुरून यावा. परंतु नारळ जमिनीत पुरताना याकडे लक्ष द्यावे त्याला असलेले छिद्र हे वरच्या बाजूला असेल. त्या नारळात मुंग्यांना जायला जागा असावी.
या उपायामुळे तुमच्यावरील कितीतरी संकटे बाधा दूर होतील. हा उपाय केल्यानंतर घरी जाताना सरळ निघून जावे. मागे वळून पाहू नये.
मित्रांनो दुसरा उपाय, संपूर्ण घराची व्यवस्थित स्वच्छता करावी. आणि घराच्या चारही कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे. याशिवाय घरातील जुने कपडे, जुने भंगार, सामान, खराब वस्तू हे सर्व घरा बाहेर काढावे.
अमावस्येच्या दिवशी केळ कचरा घाण घराबाहेर काढल्याने दरिद्रता जाते आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरातील आर्थिक अडचणी पासून आपली सुटका करते. आपल्या घरात पैशांना बरकत येते.
मित्रांनो आपली अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतात. तसेच या दिवशी पिंपळाचे केलेले पूजन अत्यंत फलदायी आहे.
आमावास्येच्या दिवशी माशांचे दान करणे अत्यंत शुभ असते. अमावस्येच्या दिवशी मासेविक्री करणाऱ्यांकडून दोन जिवंत मासे घ्यावेत. व त्यांना एखाद्या नदीत किंवा तलावात सोडून द्यावे. यामुळे राहू अथवा केतू दोष असेल तर तोही दूर होतो. मित्रांनो हा राहू केतू चा खूपच चमत्कारिक उपाय आहे.
अमावस्येच्या दिवशी खीर बनवून ब्राह्मणांना भोजनात खीर खायला दिल्यास आपल्याला महान पुण्याची प्राप्ती होते. आपल्या जीवनातील अस्थिरता दूर होते.
अमावस्येच्या दिवशी खीर बनवून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी आणि थोडीशी खीर कावळ्यांना खायला द्यावी. यामुळे आपला पितृदोष दूर होतो तसेच धनप्राप्तीसाठी ही मार्ग खुले होतात.
मित्रांनो अमावस्येच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. जर तुम्हाला देवांना अर्पण करण्यासाठी तुळशीचे पाने लागत असतील तर ती एक दिवस आधीच तोडून ठेवावी.
तुमच्या आयुष्यात काही अडचणी बाधा असतील धनप्राप्तीची मनोकामना असेल तर प्रत्येक अमावस्येला एका खोल खड्ड्यात किंवा विहिरीत एक चमचा दूध टाकावे. या उपायाने तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणींचे निवारण होईल. आणि धनलाभ होईल.
मित्रांनो या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी. यामुळे तुमचे सर्व दोष निघून जातील. कोणतेही नवीन कामाची सुरूवात खरेदी देवाणघेवाणीचे व्यवहार असे काहीही या दिवशी करू नयेत. परंतु हे उपाय जरूर करावेत.
मित्रांनो अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावशाली असतातच परंतु त्यांचे फळही खूप लवकर मिळते. आपणही हे उपाय नक्की करून पहा आणि आपला जीवनात सुख समाधान आणि धनप्राप्ती करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.