नमस्कार मित्रांनो,
बुधवार हा वार श्री गणेशाचा मानला जातो, या दिवशी भगवान श्री गणेशाची केलेली पूजा फळास येते. आपण घरी आपल्या लाडक्या गणेशाची आराधना, प्रार्थना करू शकता.
मित्रांनो गणेशाची पूजा सर्व देवांच्या आधी करतात त्यामुळे त्याना मंगलमूर्ती म्हणतात. सर्वांचे आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा आहेत. त्यांची मनोभावे पूजा केली तर ते नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात, गणपतीला संकट नाशक, विघ्नहर्ता असेही म्हटले जाते.
आपल्या घरात काही गोष्टी विपरीत घडतात, पैसा येण्याचे मार्ग बंद होतात, जरी पैसा आला तरी तो टिकत नाही त्यामुळे नेहमी गरिबी, दारिद्र्य आपल्या घरी राहते. घरातील धनाचा नाश होतो, घरातील गोष्टी नकारात्मक होतात. अलक्ष्मी घरात प्रवेश करते.
पण मित्रांनो आपण निराश न होता बुधवार च्या दिवशी हे उपाय करून पहा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी कमी होतील व पैसे येण्याचे मार्ग रिकामे होतील. त्यामुळे तुम्ही हे काही छोटे उपाय नक्की करून बघा.
मित्रांनो आठवड्यातील प्रत्येक वाराचं स्वतःच असं महत्व असते, त्या दिवशी त्या त्या ग्रहांना आवडणाऱ्या गोष्टी जर केल्या तरच जीवनात सुख, शांती येते अन्यथा चंचलता, गरिबी, अपमान, नुकसान या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात व विनाकारण कामांसाठी विलंब होतो.
बुधवारच्या दिवशी किन्न र जर दिसला तर त्याला शृंगार सामान दान करावे. तसेच या दिवशी केसांच्या संबंधित कोणतीही सामग्री खरेदी करू नका.
या दिवशी दूध कमीत कमी उकळवा, तसेच दुधातले पदार्थ बनवण्याचे टाळावे. बुधवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आले तर शुभ गोष्टी करणे टाळावे, तसेच या दिवशी उपवास, व्रत केल्यास बौद्धिक क्षमता वाढते व स्मर णशक्ती तल्लख बनते.
मित्रांनो या दिवशी गणपतीचे दर्शन, पाठ अवश्य करा. या दिवशी ईशान्य दिशेला शक्यतो प्रवास टाळावा. तसेच जर खूपच महत्वाचे काम असेल तर पांढरे तीळ किंवा धने खाऊन कामाकरिता जावे.
बुधवारच्या दिवशी नवीन चप्पल खरेदी करू नका. बुधवारच्या दिवशी खायचे पान, मसाला पान असते ते अजिबात खाऊ नका, अन्यथा आर्थिक स्थिती हळूहळू ढासळते व वायफळ पैसा खर्च होतो.
मित्रांनो या प्रकारे तुम्ही बुधवारी शक्य तितके या गोष्टींचे पालन करा ज्यामुळे तुमच्यावर श्री गणेशाची कृपा नक्की होईल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
हॅशटॅग मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.