26 फेब्रुवारी 2022 विजया एकादशीला 2 महायोग फक्त इथे दिवा लावा.

0
38

नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. माघ महिना सुरू असून माघ कृष्ण महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी 27 फेब्रुवारीला येत आहे. कधी कधी एकाच पक्षात स्मार्त आणि भागवत अशा पाठोपाठ 2 एकादशी असतात.

पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं आणि भागवत एकादशीला नाव नसतं. यंदा 26 फेब्रुवारीला विजया स्मार्त एकादशी आहे आणि 27 फेब्रुवारीला भागवत एकादशी आहे. दोन्ही दिवशी भगवान श्रीहरी विष्णुंची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास मनुष्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

तसेच शत्रूंवर विजय मिळवता येतो. मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. वारकरी संप्रदायातील लोक भागवत एकादशीचा उपवास करतात. म्हणजेच 27 तारखेला व्रत करतात. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:39 मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला सकाळी 8:12 मिनिटांपर्यंत असेल.

याशिवाय विजया एकादशी तिथीला सर्वार्थ सिद्धि योग आणि त्रीपुष्कर योग आहे. विजया एकादशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 12:11 मिनिटांपासून ते 12:57 पर्यंत असेल. दुसरीकडे या दिवशी राहू काल संध्याकाळी 4:53 मिनिटांपासून संध्याकाळी 6:19 मिनिटांपर्यंत असेल. पूजेसाठी वेदी बनवून त्यावर 7 प्रकारची धान्ये ठेवावे.

त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा आणि आंब्याच्या पानाने किंवा अशोकाच्या पानांनी सजवावे. वेदी तयार केल्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तिथे स्थापित करा. त्यानंतर श्रीहरी विष्णू पिवळी फुले, हंगामी फळे, तुळस इत्यादी अर्पण करून धूप-दीप दाखवून आरती करा.

शक्य असल्यास या दिवशी तुपाचा अखंड दिवा लावावा. एकादशी व्रताची कथा वाचायला विसरू नका. मित्रांनो एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मीची ही पूजा करावी आणि पूजेत फळ, फुले, गंगाजल, दूध, दिवा आणि नैवेद्य इत्यादी ईश्वराला अर्पण करावा.

या व्रतामध्ये दिवसभर उपवास करावा लागतो. तसे जमत नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता. या उपवासात फळांचा रस सुद्धा पिऊ शकता. एकादशीला भगवान विष्णुंची विधिवत पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या तिथीला पुन्हा विष्णूची पूजा करावी. त्यानंतर अन्नदान करावे आणि मग उपवास सोडावा.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here