फक्त 2 मिनिटांत पिवळ्या दातांना मोत्यासारखे चमकवेल ‘हे’ एक पान…

नमस्कार मित्रांनो,

जर तुमचे दात पिवळे झाले असतील किंवा दातांवर डाग पडले असतील तर आजचा हा उपाय खास तुमच्यासाठीच आहे.

दात पिवळे होण्याचे, दातांवर डाग पडण्याचे अनेक कारणे असतात. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन असेल जसं की पान, तंबा खू, गुट खा, किंवा तुमचे दात वेडेवाकडे उगवलेले असतील, आपण व्यवस्थित ब्रश करत नसाल तर या कारणांमुळे आपले दात पिवळे पडतात, दातांवर पिवळे डाग दिसू लागतात.

मित्रांनो आंब्याच्या झाडाची पाने दातांच्या पिवळेपणा वर फारच गुणकारी असतात. तुम्हाला दात जर पांढरे शुभ्र, सफेद, मोत्यांसारखे चमकदार करायचे असतील ज्याला इंग्लिश मध्ये टीथ व्हाइटनिंग असं म्हटलं जातं, तर त्यासाठी आजचा हा उपाय अतिशय चांगला आहे.

आपल्याला या उपायासाठी आंब्याच्या झाडाची 2 पाने लागणार आहेत. मित्रांनो या साठी आपल्याला जास्त कोवळी सुद्धा नको आणि जास्त निबर सुद्धा नको. या दोन्हीच्या मध्ये असलेली पाने लागणार आहेत. तर अशी 2 पाने आपण घ्यायची आहेत.

आपण घेतलेली पाने मिठाच्या पाण्यात चांगली धुवून घ्या. पानांवर असलेली धूळ, वेगवेगळी कीड असेल ती निघून जाण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करावा. मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.

आंब्याच्या झाडाची ही धुतलेली पाने आपल्याला चावून चावून खायची आहेत.

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही हा अगदी साधा उपाय करू शकता. सकाळी ब्रश केल्यानंतर सुद्धा तुम्ही हे पान खाऊ शकता. आपण जे पान घेतलेलं असेल त्याचा देठ काढून टाका. आणि ते पान चावून चावून खा.

मित्रांनो चावून खाताना या पानांची बारीक पेस्ट आपल्या तोंडात जमा होईल. तोंडात पेस्ट जमल्यानंतर आपल्या बोटाने तुम्ही दातांवर हलक्या बोटाने मालिश करून दात घासू शकता.

आपण दंत मंजन ने जसे दात घासतो अगदी त्याच प्रमाणे या पानांच्या पेस्ट ने आपले दात घासावेत. पूर्ण दात घासून झाल्यानंतर तोंडात जो चोथा जमेल तो थुंकून टाका.

अस केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी पाण्याने चांगली चूळ भरा. चूळ भरल्यानंतर आरश्यात तुम्ही तुमचे दात पाहू शकता. मित्रांनो मोत्यासारखे तुमचे दात पांढरे शुभ्र होतात.

जर तुमचे दात खूप पिवळे असतील, जास्तच डाग असतील तर हा उपाय तुम्ही 7-8 दिवस सलग करावा. तुमचे दात पूर्णपणे सफेद झालेले तुम्हाला दिसतील.

मित्रांनो आंब्याच्या पानाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीयेत. त्यामुळे त्याने आपल्या दातांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उलट आंब्याच्या पानांचा वापर करून दात घासल्याने आपल्या दातांवर असलेला पिवळसर थर निघून जातो, इतर डाग निघून जाऊन आपले दात मोत्या सारखे चमकू लागतील.

हा साधा सोपा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.

अशाच आणखी साध्या सोप्या उपायांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *