नेहमी चांगल्या माणसांसोबत देव वाईट का वागतो… स्वामी समर्थानी दिले उत्तर…

नमस्कार मित्रानो श्री स्वामी समर्थ,

आजवर तुम्हाला बरेच अनुभव आले असतील कि आपण कोणाचे वाईट केलेले नाही तरी माझ्यासोबत एवढे वाईट का घडते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो त्याची मनोभावे पूजा अर्चा सेवा करतो. चांगल्या मार्गावर चालतो, चांगले कर्म करतो तरी माझ्यासोबत असे वाईट का होते? असे विचार तुमच्या मनात कित्येकदा आले असतील.

तर मित्रानो अश्या प्रश्नाची उत्तर स्वामी समर्थानी आधीच दिलेली आहेत. एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो हे वासुदेवा नेहमी चांगले आणि खरे वागणाऱ्या व्यक्तीसोबत असे वाईट का होते? यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली त्यामध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत.

कृष्ण म्हणतो कि एका नगरा मध्ये दोन पुरुष राहात होते. पहिला माणूस आहे व्यापारी असून चांगल्या वर्तुनुकीचा होता, धर्म आणि नीतीचे तो कटाक्षाने पालन करायचा. चांगले कर्म करायचा देवाची भक्ती करायचा. मंदिरांमध्ये जाऊन देवाची सेवा करायचा. वाईट कामांपासून दूर राहून सर्व चांगली काम करायचा.

जो दुसरा व्यक्ती होता तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट काम करायचा, खोट बोलायचा. तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा. वाईट संगतीत राहायचा आणि व्यसन खूप करायचा.

एकेदिवशी काय झाले कि जोरदार पाऊस सुरु झाला, मंदिरामध्ये कोणीच नव्हते. हे बघून वाईट माणसाने मंदिरातले सर्व पैसे चोरले आणि तिथून पळ काढला. थोड्या वेळात तो चांगला व्यापारी मंदिरात देव दर्शन घेण्यासाठी आला तर लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक त्याला वाईट बोलू लागले. त्याला चोर म्हणून हिणवू लागले. खूप अपमान केला त्याचा.

तो व्यापारी कसा बसा मंदिरातून बाहेर आला. बाहेर आल्या नंतर त्याला एका बैलाने मारले तो गंभीर जखमी झाला. नंतर वाईट माणसाला पैशाने भरलेले पोतं मिळाल. तो आणखीनच खुश झाला. बोलला आजचा दिवस किती छान आहे, मंदिरातून धन तर मिळालेच वरून हे पैशाने भरलेले पोते सुद्धा मिळाले.

जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकले. तो रागातच घरी आला. घरातील देवांच्या सर्व मुर्त्या आणि फोटो काढून टाकले. देवावर नाराज होऊन आयुष्य जगू लागला. खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाचा आणि चांगल्या माणसाचा मृत्यू झाला.

तेव्हा ते दोघेही यमराजाच्या समोर गेले आणि चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न केला. मी तर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही तरी मला दुःख का? मला सारखा अपमान का मिळाला?

यमराज उत्तरला – ज्या दिवशी तुला बैलाने मारण्याचा प्रयत्न केला तो दिवस तुझ्या मृत्यूचा दिवस होता पण तुला तो मृत्यू एका जखमेमध्ये प्रवृत्त झाला. आणि त्या दुर्घटनेतून तू वाचला. आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता पण त्याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धनाच्या पोत्यामध्ये परिवर्तित झाला.

भगवंत तुमची साथ कोणत्या रूपाने देतो हे सांगणे कठीण असते. परंतु तुमच्या वाईट कर्मांपासून तुम्ही जर दूर राहत असाल तर तुम्ही त्यांची सेवा करत आहात.

ज्याला तुम्ही पूजत आहात त्याची कृपा तुमच्यावर नक्की होते. येणाऱ्या सम स्या, दुःख, संकट किंवा काहीही जे तुमच्या सोबत होत असेल याला कधीही हे समजू नका कि देव तुमच्या सोबत नाहीये किंवा तुमच्या सोबत वाईट होत आहे.

असही असू शकत कि तुमच्यावर यापेक्षा मोठे संकट येणार होते पण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे, केलेल्या सेवेमुळे तुमच्या सोबत जास्त वाईट नाही झाले.

तर मित्रानो तुम्हाला हि असं वाटत असेल कि माझ्या सोबत असे वाईट का होते, मी तर चांगले कर्म करतो. तर मित्रानो जे वाईट तुमच्या सोबत झाले आहे त्यापेक्षा जास्त वाईट तुमच्या सोबत होणार होते पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे त्याचे प्रमाण कमी झाले.

अशाच सुंदर पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.