देवघराला कळस का नसावा?.. वास्तू शास्त्रामध्ये दिले आहे उत्तर…

0
82

नमस्कार मित्रांनो,

मंडळी घरातील देवघराला कळस का नसावा? याचे कारण जाणून घ्यायचं आहे. देवघरा ला कळस न ठेवण्याचे कारण धर्मशास्त्र आणि वास्तू शास्त्र आहेत.

सर्वात आधी आपण प्रथम धर्मशास्त्र जाणून घेऊया. आपण नेहमी बघतो मोठमोठ्या देवळांना वर कळसाचा आकार दिला जातो किंवा घुमट सारखा व पिरॅमिड सारखा आकार दिला जातो आणि मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे पिरॅमिड हे सकारात्मक ऊर्जा देते.

आजूबाजूच्या वातावरणात पसरवते. मंदिरावरील कळस हेच काम करतो. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. मंदिरावरील शक्य तेवढ्या उंच बांधले जातात.

त्यावर कोणतेही बांधकाम करत नाहीत. कारण धर्मशास्त्रानुसार मंदिराच्या कळसा शिवाय काही नको. आकाशातून येणारी ऊर्जा सरळ मंदिराच्या कळसा वर पडली पाहिजे.

हाच त्यामागचा उद्देश असतो. आणि मंदिराचा कळस त्या विशिष्ट भागाचे धर्मशास्त्र सुचवते. आपण जेव्हा आपल्या घरातील देव घरावर कळस बांधतो. तेव्हा कळसाच्या वर आपल्या घराचे छप्पर येत असते आणि धर्मशास्त्रानुसार कळसाच्या वर काही नको.

धर्मशास्त्र ला मान्य नाही. हे आहे यामागचे रहस्य. आता आपण यामागचे वास्तू शास्त्र जाणून घेऊया. ज्याप्रमाणे मी सांगितले की कळस हे सकारात्मक ऊर्जा साठी असते.

कळस पासून मिळणारी ऊर्जा ही भव्य असते. मोठ्या मंदिरांवर कळस बांधला जातो. मंडळी आपण जात आपल्या घरातील देव घरावर कळस बांधला तर कलासापासून मिळणारी ऊर्जा ही आपल्या घराच्या मानाने जास्त असते.

एवढी भव्य ऊर्जा आपले घर साठवू शकत नाही. याचे काही दुष्परिणाम ही आपल्याला होऊ शकतात. मंडळी तुमच्या घरातील देव घरावर कळस असेल तर तो काढून टाकणं हाच एक उपाय आहे.

<
फक्त कळस काढत असताना मंदिराच्या देखाव्याला काही हानी होऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here