रविवारी नखे काढत असाल तर हे वाचाच, नाहीतर बरबाद व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

समुद्र शास्त्र किंवा सामुद्रिक शास्त्र, ज्योतिष शास्त्राचाच एक भाग आहे. ही एक अशी विद्या आहे ज्याच्या माध्यमाने कुठल्याही मनुष्याच्या शरीरातील विभिन्न अंगांना बघून त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो तसेच त्याच्या येणार्‍या भविष्याचे देखील अनुमान लावू शकतो.

नखे कधी काढावीत आणि कशी काढावीत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. समुद्रशास्त्र हे एक मोठं शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये नखे कधी काढावीत, कशी काढावीत याविषयी माहिती सुद्धा दिलेली आहे.

नख विशिष्ट दिवशी काढल्याने फायदे होतात तर कधी दिवस असे आहेत कि त्या दिवशी नखे काढणे आपण कटाक्षाने टाळायला हवं. कारण त्या दिवशी नखे कापल्याने फायदा नाही तर तोटा होतो असे समुद्र शास्त्र मानते.

मित्रांनो सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया कि नखे कशी काढावीत. सध्याच्या युगात बरेच जण नखे नेलकटर ने काढतात आणि नंतर ती नखे इकडे तिकडे फेकून देतात. तर मित्रांनो असे करू नका. ती नखे गोळा करून एखाद्या कागदामध्ये ती नखे घेऊन त्याची पुडी बांधून अशा ठिकाणी ती पुडी ठेवावी जिथून मांजर किंवा कुत्रा त्या पुडीवरून जाणार नाही. तुम्ही तुमच्या कचरा कुंडीत जरी नखे टाकलीत तरी सुद्धा चालेल.

सोमवार

मित्रानो तुम्ही जर सोमवारी नखे कापत आहात तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडणार हे निश्चित आहे. शुभ घटना म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडणार आहे ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.

मंगळवार

मंगळवारी जर तुम्ही नख कापलीत तर समुद्र शास्त्र असं मानत कि अशा लोकांना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे त्याच्याकडे धन, पैसे, संपत्ती मोठ्या प्रमाणात येऊ लागते. तुमची जर पैशाची समस्या असेल तर तुम्ही नखे मंगळवारी काढायला हरकत नाही.

बुधवार

मित्रांनो बुधवारी नख कापल्याने शुभ गोष्टी घडतात पण त्याचे प्रमाण कमी असते.

गुरुवार

गुरुवारी नख कापल्याने एखादी आनंदी वार्ता किंवा शुभ वार्ता तुमच्या कानी येऊ शकते. जस कि एखादा मेल, मेसेज, पत्र इत्यादी. एखाद्याचा बिजनेस असेल तर ऑर्डर वगैरे येऊ शकते. थोडक्यात एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते.

शुक्रवार

शुक्रवारी नख कापल्याने आपल्या धन संपत्ती मध्ये हळू हळू का होईना वाढ होते आणि इथून पुढचं जे भविष्य आहे ते चांगले जाते. जर तुम्हाला ऐशोआराम हवा असेल तर तुम्ही शुक्रवारी नख कापायला हरकत नाही.

शनिवार

हा दिवस सुद्धा नख कापण्यास शुभ मानला जातो. पण इतका शुभ नाहीये जितका मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार आहे. तर शनिवार सुद्धा शुभ आहे पण या 3 दिवसांपेक्षा कमी.

रविवार

मित्रानो शेवटचा जो दिवस आहे तो म्हणजे रविवार. या दिवशी चुकूनही नखे कापू नका. समुद्र शास्त्र असे मानते कि रविवारी जे लोक नख कापतात अश्या लोकांच्या मागे अनेक अडचणी, समस्या लागतात. एकदंरीत काय तर रविवारी नखे कापणे आपण कटाक्षाने टाळायला हवं.

तर मित्रानो रविवारी नखे काढायची नाहीयेत हे कायम लक्षात ठेवा. सोमवार ते शनिवार जशी गरज असेल त्या दिवशी नखे काढू शकता. समजा तुम्हाला जॉबची गरज आहे तर गुरुवारी नखे काढू शकता.

एखादी केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे तर तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. त्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. पैशा संबंधी काही स मस्या असतील तर मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *