तव्यावर कधीच ठेऊ नका हि एक वस्तू… नाहीतर येईल भयानक गरिबी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तवा हा आपल्या स्वयंपाक घरातील एक अविभाज्य भाग आहे. आपल्या किचन मध्ये जर तवा नसता तर आपल्याला भाकरी किंवा चपाती बनवताच नसती आली. मित्रांनो आज आपण तव्या बद्दल अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टी आजवर तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील. वास्तु शास्त्रानुसार आपल्या किचन मध्ये असलेल्या तव्याचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी बहुतेक जणांना हे माहित नसते कि तवा आणि कढई हे राहूचे प्रतिनिधित्व करतात. या वस्तू आपले नशीब बिघडवू शकतात किंवा आपल्याला अधोगतीकडे नेऊ शकतात. हिंदू धर्म शास्त्रानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये.

आपल्याकडे घरात कोणाचा मृत्यू होतो त्यावेळीच तवा पालथा घातला जातो, याचा अर्थ आपल्या घरात स्वयंपाक बनविला जाणार नाही. आपल्या घरातील कोणत्या सदस्याचा मृ त्यु झाल्यास घरातील तव्याचा वापर बंद केलेला आहे हे दाखवण्यासाठी तवा पालथा ठेवला जातो.

जर कोणी व्यक्ती घरात मुद्दाम तवा पालथा टाकत असतील तर हे एक अशुभतेचे लक्षण आहे. म्हणून चुकून सुद्धा कधीही तवा पालथा टाकू नये. खूप वर्षांपर्यंत एकच तवा वापरु नये. कारण दिवसेंदिवस त्यावर तेलाचा थर जमा होत जातो, खूप घासून सुद्धा थर निघत नाही.

काही घरांमध्ये तेलाचे थर जमा होऊन अगदी काळेकुट्ट झालेले तवे असतात. अशाच तव्यावर चपाती, भाकरी केल्या जातात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण त्याच तव्यावर स्वयंपाक करतो त्यावेळी त्या थराचे काही अंश आपल्या स्वयंपाकात उतरतात. अशामुळे आजारांना निमंत्रण मिळत असते.

खूप काळापर्यंत आपण तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो. अशा परिस्थिती आपण कधीची धनवान होऊ शकत नाही. आपण कायम दरिद्रीच राहतो किंवा हळू हळू आपली वाटचाल दारिद्र्याच्या दिशेने व्हायला सुरवात होते.

तवा किंवा कढई याचे काम झाले कि लगेचच स्वच्छ करून जागेवर ठेवून द्यावे. गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे घरात भांडण तंटे आणि वादविवाद होतात. घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहते.

म्हणून तवा थंड झाल्यानंतरच त्याच्यावर पाणी टाकावे. तवा व कढई नेहमी स्वच्छ ठेवावी. नाही तर दोष लागतात. स्वयंपाक करताना ज्यावेळी आपण पहिली चपाती किंवा भाकरी तव्यावर टाकतो त्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडावे व त्यानंतर चपाती भाकरी करण्यास सुरवात करावी.

असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. घरात बनवलेली पहिली भाकरी असो किंवा चपाती असो थोडे साजूक तूप लावून गो मातेला खायला द्यावी. कारण गाई मध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो.

गाईला जर पहिली चपाती खायला दिली तर आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपा होते व धनाची कमतरता कधीची जाणवत नाही.आपल्यावर देवी अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद राहून आपले घर सदैव धन धान्याने भरलेले राहते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.