नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अनेक लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, मात्र या झाडाखाली जी व्यक्ती बसते तेव्हा दरिद्रता देवी अलक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात नक्की होतो. घरात गरिबी येऊ लागते.
आपल्या घरातील पैसा विनाकारण नको त्या गोष्टींवर खर्च होतो. कधी आजा रपणा मध्ये, कधी अचानक मोठा त्रास होतो, अगदी कोणत्याही कारणास्तव पैसा टिकत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असा मात्र जर या झाडाखाली तुमचा संपर्क वारंवार येत असेल तर गरिबी दरिद्रता येते.
मित्रांनो यासंबंधी हिंदू धर्मशास्त्र सांगते की भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची मोठी ज्येष्ठ बहिण म्हणजे अलक्ष्मी ही या झाडावर वास करते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार हे झाड आहे पिंपळाचे झाड. अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण पिंपळ, वड किंवा तुळस ही झाडे हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जातात.
मित्रांनो पिंपळाच्या वृक्षाचे प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णू यांचा आणि माता लक्ष्मी यांचा वास असला तरीसुद्धा अलक्ष्मीचा सुद्धा या ठिकाणी वास असतो. या संबंधित कथा पुढीलप्रमाणे.
एकदा देवी लक्ष्मी श्रीहरी विष्णू यांच्या सोबत आपल्या बहिणींना भेटण्यासाठी आली. तेव्हां श्रीहरी विष्णू देवीला असा आशीर्वाद दिला की हे जेष्ठा देवी आज शनिवार आहे आणि शनिवारी आम्ही तुला भेटण्यासाठी या पिंपळाच्या झाडाखाली आलो आहोत. म्हणून जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावेल तो त्यांच्या घरी आम्ही दोघे कायमचे वास्तव्य करू. म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो.
यासोबत श्रीहरी विष्णू यांनी असे सांगितले की जो मनुष्य रिकाम्या हाताने पिंपळाच्या झाडाखाली जाईल त्याच्या बरोबरच दरिद्रता त्याच्यासोबत घरी जाईल. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. पिंपळा ला अर्पण करण्यासाठी यथाशक्ती पाणी, तांदूळ, साखर जे काही शक्य आहे ते घेऊन जावे. नाहीतर दरिद्रता मागे लागते.
यावर ज्येष्ठा देवी म्हणाली हे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे सांगितले पण माझ्यासाठी काय?
श्री विष्णू म्हणाले तुला काय हवे ते माग. यावर देवी म्हणाली सप्ताहातील सात दिवसांपैकी माझा असा एक हक्काचा दिवस मला हवा. त्यादिवशी माझ्या पतीसाठी मी या झाडाखाली नृत्य करेन. तो संपूर्ण दिवस माझा असेल. इतर कोणी व्यक्ती त्या दिवशी मध्ये आला तर मी त्याच्या घरी कायमचे वास्तव्य करेल.
श्री विष्णूने याप्रमाणे सप्ताहातील रविवार हा देवींना दिला. त्यादिवशी पिंपळाच्या झाडाखाली कोणीही येणार नाही. आणि जे येतील त्यांच्या घरी तुझे कायमचे वास्तव्य असेल. असा आशीर्वाद श्रीहरी विष्णू नी देवीला दिला.
मित्रांनो आणि म्हणूनच रविवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये, दिवा लावू नये, त्याला स्पर्श करू नये. कधीकधी भिंतीमध्ये पिंपळाची झाडे आलेली असतात. त्यांना कितीही काढून टाकलं तरी ते पण आपण नाही येतच राहतात. दारिद्र्याने एकदा का घरामध्ये प्रवेश केला तर ते सहजासहजी बाहेर पडत नाही.
मित्रांनो एखाद्या रविवारी पौर्णिमा आली आहे किंवा अमावस्या आली आहे किंवा अष्टमी कोणत्याही प्रकारची एक महत्त्वपूर्ण तिथी आहे किंवा श्रीकृष्ण-जन्माष्टमी आहे तर अशा या महत्त्वपूर्ण तिथी असतात. सण-उत्सव असतात एखादी मोठी जयंती असते. जसे की कृष्णजन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांचा अवतार. यांना वारांचे महत्त्व उरत नाही. ठराविक दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमा आहेत तर त्या ठिकाणी तो वार आपोआपच वगळला जातो.
त्या वाराचे कोणतेही महत्त्व शिल्लक रहात नाही कारण जर पौर्णिमा असेल तर लक्ष्मीचं तत्व इतक्या प्रचंड प्रमाणात कार्यरत असतं की तुम्ही अगदी निसंकोचपणे पिंपळाच्या वृक्षाची रविवारी सुद्धा पूजा करू शकता.
मात्र जर कोणत्याही प्रकारची विशिष्ट स्थिती नाहीये, महत्त्वपूर्ण दिवस नाही आहे अशावेळी मात्र रविवारी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली चुकूनही जाऊ नका. पिंपळाच्या वृक्षाखाली थांबणं त्याठिकाणी सर्व गोष्टी आपण कटाक्षाने टाळा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.