दुकान चालत नसेल तर करा हा उपाय

0
41

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तुमचा व्यवसाय म्हणावा तसा चालत नाहीये का? तुमच्या दुकानात ग्राहकांची संख्या कमी झाली आहे का? तुमच्या उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला तोटा होत आहे का? हे सगळे तुमच्या बरोबर होत असेल तर ही माहिती तुमच्या साठीच आहे आणि शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे कामाला भरपूर हुशार माणसं असतात, शिवाय भांडवलही भरपूर असते, जागा ही मोक्याची असते पण तरीसुद्धा धंदा मात्र पाहिजे तसा होत नाही. बहुतेक वेळा गुप्त शत्रूंचा कारवाया सतत चालू असतात. कधी वास्तु दोष असतो तर कधी व्यापाऱ्याच्या पत्रिकेत दूषित ग्रहांची महादशा सुद्धा चालू होते.

पण अशा वेळी करायचं काय? त्यासाठी हा उपाय आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमचं दुकान उघडण्यापूर्वी 108 वेळा तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करूनच तुम्ही तुमचं दुकान उघडायचे आहे.

त्यानंतर दुकानाची साफसफाई करावी. विक्री जोरात सुरू होते. या मंत्राला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. नित्य रोज दुकान उघडण्यापूर्वी हा मंत्र 108 वेळा जपूनच दुकान उघडावे. तसेच दर रविवारी उडीद हातात घेऊन या मंत्राचा जप करून काही उडीद दुकानात टाकावे आणि काही उडीद दुकानाच्या बाहेर टाकावे.

हे उडीद टाकताना म्हणायचा मंत्र असा आहे श्री महालक्ष्मी देवता नमो नमः या उपायाने तुमचा व्यवसाय चांगला चालतो. त्यानंतर आणखीन एक उपाय म्हणजे व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी 11 शनिवारी 11 लवंगाची माळ कोणती ही सोयीची वेळ ठरवून श्री पंचमुखी हनुमंतास घातल्याने व्यवसायातील किंवा नोकरीतील अडचणी संपतात.

फक्त ठरलेली वेळ दर शनिवारी सारखीच असावी. त्याबरोबरच धंदा जर लोखंडी किंवा तांबा पितळ अशा धातूंच्या खरेदी विक्रीच्या संबंधीशी असेल तर शनिवारी दुकानावर येणाऱ्या याचकाना दान नक्की द्यावे. धंदा जर चैनीच्या वस्तूंच्या असेल तर शुक्रवारी दुकानावर येणाऱ्या याचकाना दान करावं.

दुकानाची उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित केलेली असेल तर ती काटेकोरपणे पाळावे. चिनीमातीच्या एका भांड्यात सुमारे पाव किलो तुरटीचे खडे ठेवून ते भांडे दुकानात एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यावे. त्यामुळे न का रा त्म क शक्ती आपल्या दुकानांमध्ये प्रवेश करत नाहीत.

मित्रांनो तुमच्या उद्योग व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करत राहावा यासाठी सुद्धा आपण काही उपाय पाहणार आहोत. त्यातील एक उपाय म्हणजे सोमवारी अशोकाच्या झाडाची 11 पाने, मंगळवारी वडाच्या झाडाच्या 11 पाने, रविवारी पिंपळाच्या झाडाची 11 पाने घ्यावीत आणि ही पानं स्वच्छ पुसून त्या प्रत्येक पानावर केशराचा गंधाने बेलाच्या झाडाच्या काडीने रिम हे बीजाक्षर लिहावे.

या बीज मंत्राचा एक लक्ष जप करून ही पाने जल प्रवाहात सोडून द्यावे. त्यामुळे व्यापारात बरकत होऊन आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत होते. तसेच एक उपाय खास दुकानदारांसाठी आहे. ज्यांचे दुकान आहे ती लोक हा उपाय सहज करू शकतात. दुकान असेल तर एखाद्या शुक्रवारी ते सुरू करण्यापूर्वी पत्नी किंवा मातोश्री यांच्याकडून दुकानातील फोटोची पूजा करावी.

पेढ्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद आणि एक एक रुपया दुकानातील सर्व नोकरांना द्यावा. दुकानाचा कायाकल्प होतो असं म्हटलं जातं. हा उपाय प्रेस किंवा व्यावसायिकांसाठी उपयोगी ठरतो. तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हे होते काही उपाय तुमचा उद्योग व्यवसाय उत्तमरित्या चालण्यासाठी ते तुम्हाला मदत करतील.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here