घरात लक्ष्मी कशी येते? या गोष्टी तुम्हाला करतील श्रीमंत.

0
58

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपल्या ज्या काही गरजा आहेत आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करू शकू. प्रत्येकाच्या जीवनात पैसा हा खूप महत्वाचा असतो. हा पैसा मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट मेहनत करत असतो.

पैसा कमावणे तर कठीण आहेच पण त्याहीपेक्षा हा पैसा टिकवून ठेवणे जास्त कठीण आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की माता लक्ष्मी चंचल आहे ती एकाच ठिकाणी जास्त दिवस थांबत नाही. अशावेळी घरात आपल्याला माता लक्ष्मीला टिकवून ठेवायचे असेल.

म्हणजेच माता लक्ष्मीचा आपल्या घरात स्थायी निवास जर आपल्याला करायचा असेल तर आपण काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवायला पाहिजे. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव निवास करेल तिचा शुभाशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहील.

यासंबंधीची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रानो तुम्हाला जर असे वाटत असेल की माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन व्हावे आणि कायमचे वास्तव्य राहावे. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही छोटे छोटे उपाय किंवा छोटे छोटे नियम जर आपण पाळले.

तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील. आपल्या घरामध्ये धनाचे आगमन होईल. आपल्याला वाटत असेल की धन वृध्दी व्हावी. त्यासाठी आपण देवघरात जो दिवा लावतो. कापसाची वात न लावता लाल धाग्याची वात लावायची आहे. दररोज दिवा प्रज्वलित करायचा आहे.

माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. आपण घरात लाल रंगाची वात लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपण दळण करत असताना बरेच जे धान्याचे कण आहेत. गहू असतील, ज्वारी असतील तर हे धान्याचे कण कचऱ्यात जातात.

किंवा जेव्हा तुम्ही तांदूळ धुत असता तेव्हा पाण्यासोबत काही तांदळाचे दाणे देखील वाहून जातात. किंवा काही घरामध्ये दररोज अन्न वाया जाते. जर अशा प्रकारे जिथे अन्नाचा अपमान केला जातो तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. याउलट जिथे अन्नधान्याचा मान अतिथींचा आदर सत्कार केला जातो.

तिथे माता लक्ष्मी सदैव वास करते. मित्रांनो ज्या घरात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्य झोपतात किंवा जेवण करतात तर अशा ठिकाणी साक्षात विष्णू भगवान जरी असले तरी माता लक्ष्मी तिथे थांबत नाही. कारण सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते.

<
त्यामुळे आपण जर यावेळी घरात झोपलो किंवा जेवण करत असलो तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही. सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी आपण कधीही झोपू नये किंवा भोजन करू नये. तसेच सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये.

सुर्यास्त होण्यापूर्वी घरात झाडू मारून घर स्वच्छ करावे. तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य प्रवेश द्वार आहे ते उघडे ठेवावे कारण ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्याचबरोबर मुख्य दरवाजा जवळ माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा प्रज्वलित करा.

हिंदू संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे चुकूनही झाडूला लाथ मारू नये किंवा पायाने स्पर्श करू नये. झाडूचे काम झाल्यावर तो अशा ठिकाणी ठेवावे जिथे कोणाची नजर पडणार नाही. हा झाडू ठेवताना नेहमी आडवा ठेवावा.

ज्या घरात झाडू उभा ठेवला जातो त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. आपले घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे. असे म्हटले आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. माता लक्ष्मीला अस्वच्छ ता अजिबात आवडत नाही. म्हणून आपले घर नेहमी साफ ठेवावे. बऱ्याच लोकांना बोटाना थुंकी लावून पैसे मोजण्याची सवय असते.

ही सवय अत्यंत चुकीची आहे. अशा करून तुम्ही साक्षात माता लक्ष्मीचा अपमान करत असता. तुम्ही जेव्हा कधी बँकेत पैसे भरायला जाल तेव्हा मनातल्या मनात मनात माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप अवश्य करा. यामुळे तुम्हाला बँकेत पैसे भरण्याची संधी सतत मिळत राहते.

यामुळे तुमचे बँक बॅलन्स सतत वाढत जाईल. बुधवारच्या दिवशी आपण कोणालाही उसने किंवा उधार पैसे देऊ नये. कारण यादिवशी दिलेले पैसे परत मिळत नाहीत. ते बुडतात. त्यामुळे बुधवारी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नये. तसेच जर तुम्हाला उधार पैसे घ्यायचे असतील.

तर हे पैसे घेतल्यावर त्यातील पन्नास किंवा शंभर रुपये परत देऊन टाका यामुळे तुमचे हे कर्ज लवकर फिटून जाईल. तसेच घरातील स्त्री स्वयंपाक बनविल्यानंतर पहिली रोटी आहे. मग भाकरी असो, चपाती असो, काहीही असो तर ही पहिली रोटी गोमातेला खाऊ घालते, गोमातेची पूजा करते.

त्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहतो. त्या घरात धन धान्याची वृध्दी होते. पैसा कधीही कमी पडत नाही. मित्रांनो आपण जर आपल्या जीवनात अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि आमलात आणल्या तर नक्कीच आपल्यावर देखील माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील.

आणि आपल्या घरावर आर्थिक समस्या कधीही येणार नाही. माता अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन धान्यात वृध्दी होईल. तर तुम्हीही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here