कॅब ड्रायव्हरच्या खुलाशानंतर मारहाण व्हिडीओ प्रकरणात ट्विस्ट… पहा नक्की काय आहे प्रकरण…

नमस्कार मित्रानो,

एका कॅब ड्रायव्हरला एक तरुणी मारहाण करत असल्याचा व्हिडि ओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या घटनेत एका नवा ट्विस्ट समोर आला आहे. लखनऊमधील या घटनेत कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱी तरुणी ही पोलिसांची ख बरी असल्याचा दावा कॅब चालकानं केला आहे. कॅब ड्रॉयव्हर ने या तरुणीचं पोलिसांसोबत संगनमत असून आपल्याकडून पोलिसांनी 10 हजार रुपये उक ळल्याचा दावाही त्यानं केला आहे.

काय म्हणाला कॅब ड्रायव्हर

आपलं काम संपवून आपण घरी चाललो असताना, ही घटना घडल्याचं कॅब ड्रायव्हरनं सांगितलं. घरी चाललो असताना वाटेत सिग्नल लागला म्हणून आपण गाडी थांबवून उभे होतो. तेवढ्यात ती तरुणी गाडीजवळ आली. खिडकीतून हात आत घालत तिने आपला शर्ट पकडला आणि मारामा री करायला सुरुवात केली.

सुरुवातीला काय घडतंय, हेच कळेना. मी पूर्ण गोंध ळून गेलो. माझा दोष तरी काय, असं मी तरुणीला विचारत होतो. या दरम्यान तरुणीनं आपल्या पाकिटातील 600 रुपये काढून घेतले. सलग 10 मिनिटं तिनं मार हाण केली. मात्र आपली चूक काय, याविषयी ती काहीच सांगत नव्हती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेलं.

तरुणाला अट क

पोलीस स्टेशनला पोहोचताच पोलिसांनी मला लॉ कअपमध्ये टाकलं. घटना समजल्यानंतर माझे दोन भाऊ मला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला आले, तेव्हा त्यांनाही पोलिसांनी लॉ कअपमध्ये टाकलं आणि तिघांवरही शांतता भं ग केल्याचा गु न्हा नोंदवला, असं कॅब ड्रायव्हरनं सांगितलं आहे.

तरुणीला मात्र पोलीस काहीही बोलले नाहीत आणि तिला घरी सोडलं. प्रियदर्शिनी नारायण उर्फ लक्ष्मी असं तरुणीचं नाव असून ती पोलिसांची ख बरी असल्याची माहिती स्वतः कृष्णानगर पोलिसांनीच दिली असल्याचं कॅब ड्रायव्हर म्हणाला.

हे वाचा

कॅब चालकाला मारहाण करणं त्या महिलेला भोवलं. व्हिडीओ समोर येताच पोलिसांची कारवाई. रात्रभर लॉ कअपमध्ये ठेवल्यानंतर पोलिसांनी सकाळी आमच्याकडून 10 हजार रुपये घेतले आणि मगच आमची सुटका केली, असं या कॅब ड्रायव्हरनं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळाच ट्वि स्ट मिळाला असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस आता या प्रकरणात काय खुलासा करतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *