हळीव खाण्याचे चमत्कारी फायदे; रक्त, केस, त्वचा, हृदय…

0
63

नमस्कार मित्रांनो,

आज आपण अळीव महणजेच (हलीम) याचे चमत्कारी फायदे रक्त, केस, त्वचा, हृदयरोगावर काय आहे ते बघणार आहोत. हळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. आणि हे खूप पौष्टिक आहे. हळीव यामध्ये लोह, कॅल्शियम जीवनसत्व (क)आहे. तसेच हळीव हे रज:स्त्राव नियमित करते. त्यामध्ये अँ’टीऑ’क्सिजन आहे व रक्त शुद्ध करनारे गुण आहेत.

हळीव याचे सेवन तरुण मुलांनी करणे फायद्याचे आहे. बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात. हळीव भिजत घालून त्याला मोड आणून खाऊ शकतो. हळीवमुळे डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते. हळीव हे चिकट असतात, त्याच्या सेवनाने मळविरोधाची तक्रार कमी होते. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते, हळीवमध्ये आयन भरपूर प्रमाणात असते.

हे खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. आणि रोज खाल्ल्यामुळे एनिमियाची तक्रार दूर होते. गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी नंतर हळिवाचे लाडू किंवा खीर नेहमी दिली जाते. आपल्या भारतातील स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असणे ही नेहमीची बाब आहे. म्हणून हळीवाचे सेवन महिलांनी रोज करावे. हळीव हे केसांसाठी फायदेमंद आहे.

हळीवमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि ई विटामिन आहे. त्यामुळे केसांची वाढ होऊन केस चमकदार होतातच परंतु केस तुटत नाहीत. केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. हळीवमध्ये भरपूर प्रमाणात तेल पोषकद्रव्य आहेत. ज्यांना केसांच्या समस्या आहे, त्यांनी हळीवचे सेवन रोज करावे. आपली त्वचा चांगली होते.वाढत्या वयासोबत त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

आणि त्वचा तजेलदार, चमकदार होते. हृदय रोग असेल त्यांना फायद्याचे आहे. हृदय रोग असणाऱ्या व्यक्तींनी जरूर सेवन करावे कारण हळीवमध्ये ओमेगा थ्री आहे व कॉलेस्ट्रॉल कमी होते.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here