कसलाही मूळव्याध संपवा. याची फक्त तीन पानेच पुरेशी आहेत. रुई, मदार, मंदार, सांधेदुखीवर तुफान गुणकारी

0
73

नमस्कार मित्रांनो,

आज आपण रस्त्याच्या कडेला, शेताच्या कडेला किंवा जंगलात सहजा सहजी आढळणाऱ्या रुईच्या आयुर्वेदिक उपयोगाची माहिती पाहणार आहोत. हिंदीतून रुईला मदार किंवा मंदार या नावाने ओळखतात. या रुईच्या शास्त्रीय नाव caltropis Gingatea असे आहे.

अनेक आजार बरे करण्यासाठी घरगुती उपचारांसाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. रुईच्या झाड भारतभर सर्वत्र आढळते. रुईच्या प्रामुख्याने दोन जाती आढळतात. एक म्हणजे पांढरी फुले येणारी रुई आणि दुसरे म्हणजे जांभळी फुले येणारी रुई.

रुईची पाने किंवा फांदी तोडल्यानंतर तिथून पांढऱ्या रंगाचा चिक निघतो. तो अत्यंत गर्भपातक असतो. याशिवाय हे झाड कुष्टरोग, त्वचारोग, अस्थमा यांच्या उपचारासाठी देखील वापरले जाते. याच्या मुळांचा वापर जुलाब व अतिसार मध्ये केला जातो. या झाडाची मुळे पचनासाठी गुणकारी असतात.

चला तर पाहूया ही रुई आणखी कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या आजारांच्या उपचाराकरिता येऊ शकते. तुमच्या घराशेजारी हे झाड असल्यास आज सांगितलेले फायदे नक्कीच लक्षात ठेवा. जर तुम्ही सांधेदुखीने ग्रासलेले असाल तर हे रुईचे झाड तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

त्यासाठी जे सांधे दुखतात त्याठिकाणी ही पाने रात्रभर बांधावीत. याने सांधेदुखी बरी होते. चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स म्हणजे डाग असतील तर त्यावर देखील हे झाड गुणकारी आहे. तीन ग्रॅम हळद रुईच्या मुळांच्या पेस्ट सोबत मिसळून याचा लेप प्रभावीत ठिकाणी लावल्याने खाज कमी होते.

मूळव्याधीवर देखील हे झाड अत्यंत गुणकारी असते. तुम्ही जर मूळव्याधीचा त्रास सहन करू शकत नसाल तर या रुईचा उपयोग करा. या रुईच्या फांदीचे तुकडे पाण्यात भिजवून या पाण्याने मूळव्याधीचा कोंब धुतल्याने कोंब हळूहळू सुकून गळून पडतो. आणि तो कमी होतो.

यासाठी असा नियमित आठवडाभर उपाय करायला हवा. रुईच्या चिकात जखम भरण्याची देखील ताकद असते. रुईच्या चिकात हळद मिसळून पेस्ट बनवावी. ही पेस्ट जखमेवर लावल्याने जखम लवकर खपली धरते व बरी होते. या शिवाय जखमेवर गरम पाण्यातून काढलेली रुईची पाने बांधल्यावर देखील जखम बरी होते.

दात दुखीपासून लगेच सुटका करण्यासाठी या रूईचा वापर केला जातो. याच्या चिकाने हिरड्यांची मालिश केल्यावर देखील दात दुःखी बरी होते. रुईच्या पानांचा उपयोग वांझपणा वर उपचार करण्यासाठी केला जातो. यासाठी पांढऱ्या रुईच्या मुळांना सावलीत वाळवून बारीक पावडर बनवा.

<
2 ग्रॅम या प्रमाणात गाईच्या दुधात टाकून पिल्याने वांझपणाची समस्या नष्ट होते. योग्य पद्धत व योग्य प्रमाण माहीत असल्यास हे झाड नक्कीच गुणकारी ठरते. परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. यामध्ये असे काही रसायने असतात जे हृदय रोग्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हृदय रोगींनी याचे सेवन टाळावे.

याच्या रसाने उलटी मळमळ किंवा जुलाब देखील होऊ शकतात. हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. व चक्कर देखील येऊ शकते. गर्भवती स्त्रियांनी व स्तनदा मातांनी तर याचे सेवन करूच नये. त्यामुळे या रुईचा वापर करतेवेळी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हे होते रुईच्या पानांचे औषधी उपयोग आणि त्यापासून होणारे संभाव्य तोटे.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here