फक्त छातीवर चोळा फुप्फुस पूर्ण स्वच्छ, छातीतील कफ जळून जाईल, सर्दी खोकला तर चुटकीत गायब, प्रत्येकाने बनवाच

0
152

नमस्कार मित्रांनो,

हे तेल आहे ते अवश्य घरामध्ये बनवून ठेवा लहान असेल मोठा असेल वृद्ध असेल छातीवर थोडा वेळ चोळा फुप्फुस पूर्णपणे क्लीन होईल. फुप्फुसांमध्ये साठलेलं कफ जळून जाईल फुफ्फुसांमध्ये झालेले इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाईल आणि फुप्फुस पूर्णपणे क्लीन होईल. सर्दी खोकला तर चुटकीमध्ये गायब होईल.

सर्दी खोकल्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही. इतका हा जबरदस्त आणि परिणामकारक उपाय आहे. आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे फुप्फुस. फुप्फुस आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो आणि हे फुप्फुस जर आपलं क्लीन असेल तर कुठलाही आजार आपल्याजवळ येणार नाही.

कारण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची जी मात्र आहे ती चांगल्या रीतीने राहते म्हणून आपल्या फुप्फुस स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचा आहे. मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपल्याला हे जे तेल आहे ते आपल्याला बनवून ठेवायचा आहे. अगदी साध्या पद्धतीने बनवता येतं. लहान असेल मोठा असेल सर्वांना हे तेल वापरता येतं.

सर्दी-खोकला झाल्यानंतर छातीमध्ये कफ झाल्यानंतर कुठलाही उपाय करण्याच्या ऐवजी हे तेल जर आपण रात्री झोपताना छातीवर चोळला तर तुमच्या छातीमधील कफ पूर्णपणे जळून जातो आणि खोकला बंद होतो. सर्दी निघून जाते त्याचबरोबर फुप्फुससुद्धा एकदम क्लीन होतं. तर हे जे तेल आहे ते अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला बनवता येतो.

यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे खोबरेल तेल नारळाचं तेल. हे तेल आपण कोणत्याही प्रकारचा वापरू शकतो. तुम्ही हे तेल जास्त प्रमाणात सुध्दा बनवून ठेवू शकता. आपल्याला 50 ग्रॅम खोबरेल तेल लागणार आहे. हे खोबरेल तेल आपल्याला एका भांड्यामध्ये मंद आचेवर गरम व्हायला ठेवायचे आहे.

त्यानंतरचा दुसरा घटक जो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे ओवा. ओवा हा सर्दी खोकला छातीमधला कप फुप्फुस क्लीन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. लहान मुले असतील तर तुम्हाला माहीत असेल सर्दी खोकला त्याच्या छातीमध्ये कफ झाल्यानंतर त्याला ओव्याचा शेक दिला जातो.

त्या बाळाच्या किंवा माणसाच्या छाती मधला कफ पूर्णपणे निघून जातो, खोकला पूर्णपणे बंद होतो. इतका हा गुणकारी ओवा आहे. असा ओवा सर्दी खोकला बंद करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. असा ओवा एक चमचा या तेलामध्ये टाकायचा आहे. त्यानंतरची पुढची वस्तू या तेलामध्ये आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चार लसूण पाकळ्या.

चार ते पाच लसूण पाकळ्या आपल्याला घेऊन त्या सोलून त्या तेलामध्ये टाकायचे आहे. लसूण बारीक चेचून टाकले तरी चालेल. एक चमचाभर ओवा आणि चार-पाच लसूण पाकळ्या या सर्व घटकांना मंद आचेवर काळे पडेपर्यंत त्या तेलाला उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे.

गॅस बंद केल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायचे आहेत. कुठलाही कापूर असला तरी चालेल भीमसेनी कापूर असेल तरी चालेल किंवा साधा कापूर असला तरी चालेल. 2 कापराच्या वड्या याच्यामध्ये टाकायचे आहेत. या कापराच्या वड्या या तेलामध्ये टाकल्याबरोबर तुम्हाला लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे.

लगेच झाकण ठेवण्याचे कारण म्हणजे कापराचा वास बाहेर जाऊ द्यायचा नाही. हे तेल पूर्णपणे गार होईपर्यंत हे आपल्याला झाकण तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे तेल गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि ज्या व्यक्तीला सर्दी झालेला असेल, खोकला झालेला असेल,

छातीमध्ये कप झालेला असेल अशा सर्व लहान मोठ्या व्यक्तींना झोपते वेळी छातीवर हे तेल चोळायचे आहे. फक्त रात्री एक वेळेस तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला सकाळपर्यंत याचा रिझल्ट दिसेल. तुमचं फुप्फुस पूर्णपणे स्वच्छ होईल, छातीतील कप जळून जाईल. हे तेल अवश्य बनवून त्याचा वापर करा.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here