होळाष्टक काळात ही 5 कामे करू नये.

0
54

नमस्कार मित्रांनो,

होळीवहा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या 8 दिवस होलाष्टक साजरे केली जातात. होळाष्टकात काळात कोणतेही मांगलिक कार्य करण्यास मनाई असते. होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात.

या 8 दिवसात हिरण्यकशिपूने आपला मुलगा प्रल्हादला मारण्याच्या उद्देशाने खूप अत्याचार केले होते असे मानले जाते. पण प्रल्हाद नारायणाचे नामस्मरण करत राहिला. यामुळे हिरण्यकशिपू प्रल्हादचे काहीही नुकसान करू शकला नाही.

पौर्णिमेच्या दिवशी हिरण्यकशिपूची बहीण होलिका प्रल्हादला आपल्या मांडीत घेऊन अग्नीत बसली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. पण वरदानाचा गैरवापर केल्यामुळे ती स्वत: जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशी आख्यायीका प्रसिद्ध आहे.

होळाष्टकच्या 8 दिवसात नारायण किंवा आपल्या इष्टदेवाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. याकाळात जप, तपश्चर्या, स्नान आणि ध्यान हे शुभ मानले जातात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते, त्यानंतर होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

या वर्षी होलाष्टक गुरुवार 10 मार्चपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत होळाष्टक दरम्यान कोणतीही शुभ कार्य करी नये असे म्हणतात. पण कोणकोणती कामे होळाष्टक करू नये चला जाणून घेऊयात.

1) मुंडन, विवाह, नामकरण , या 16 पैकी कोणतेही संस्कार या 8 दिवसांत करू नयेत. असे मानले जाते की ते शुभ फल देत नाही. कोणतेही शुभ कार्य करताना नक्की विचार करा.

2) जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल , तर होलाष्टक लावण्यापूर्वी ते विकत घ्या, परंतु होलाष्टक दरम्यान करू नका. यानंतर होळीच्या दिवशी वाहन घरी आणावे.

3) यादरम्यान कोणताही व्यवसाय सुरू करू नये . ज्योतिषीय कारणे पाहिल्यास, होळाष्टकच्या आठ दिवसात बहुतेक ग्रह अग्नी अवस्थेत असतात, अशा स्थितीत त्यांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते.

4) यादरम्यान तुम्ही घर , प्लॉट इत्यादी खरेदी करण्याचा किंवा त्यांच्या रजिस्ट्रीचा विचार करत नसल्यास. होळाष्टकानंतर हे काम कोणत्याही शुभ तिथीला करावे.

5) होळाष्टकापूर्वी घर बांधण्याचे काम करत असाल तर ते चालू द्या, पण त्याची सुरुवात होळाष्टकाने करू नये.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here