तुळशीमध्ये टाका फक्त हि एक वस्तू… दोन दिवसात तुळस होईल डेरेदार…

नमस्कार मित्रानो,

प्रत्येकाच्या घरी एक तरी तुळस लावलेली असते. खेडेगावात तर तुळशी वृंदावन असते. शहरात जागेच्या अभावी ते पाहायला मिळत नाही.

तुळशीची नित्य नियमाने पूजा अर्चा , पाणी सर्व केले तरी तुळस लवकर वाढत नाही. काहींची तुळस तर लवकर सुकून जाते. बऱ्याचदा तुळशीची पाने मोठीच होत नाहीत छोटीच राहतात.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुळशीवर ज्या मंजुळा ( बीज ) असते ते सुकण्याच्या आतच तुम्हाला ते काढायचे आहे. सुकून गेल्यावर ते गळून पडतात आणि तुळशीला हानी पोहोचवतात.

म्हणून लक्षात असुद्या कि बियांना सुकण्याआधीच काढायचे आहे. तुळस जर वाढत नसेल तर रोज रोज पाणी घालू नका. जेव्हा माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी घाला. जास्त पाणी घातल्याने तुळशीची मुळ ओली राहून सडतात. त्यामुळे तुळशीची वाढ पूर्ण पणे थांबते…

चला तर मग जाणून घेऊ तुळस डेरेरदार व्हावी यासाठी नक्की कोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे.

इप्सम मिठाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हो इप्सम मीठ हे तुळस वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याचा वापर दोन पद्धतीने करू शकतो. मीठ पाण्यात मिसळून ते पाणी तुळशीच्या पानांवर स्प्रे करू शकता किंवा एक चमचा इप्सम मीठ घेऊन ते खोडाला किंवा मातीत सोडू शकतो.

लक्षात ठेवा स्प्रे करत असाल तर एक लिटर पाण्यात एक चमचा इप्सम मीठ घ्यायचे आहे. जास्त घ्याल तर पाने पिवळी पडून जाळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पाण्यात मीठ मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटांने स्प्रे करू शकता. लक्षात असुद्या जर तुम्ही तुळशीची पाने नित्यनियमाने खात असाल तर पानांवर स्प्रे करू नका, डायरेक्ट माती मध्ये मीठ सोडा. दोन ते तीन दिवसांतच तुम्हाला फरक उघड्या डोळ्यांनी दिसेल.

तुमच्याही तुळशीची वाढ थांबली असेल तर एकदा नक्की हा उपाय करून पहा.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज हॅशटॅग मराठी लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *