नमस्कार मित्रांनो,
हिंदू संस्कृती मध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक तरी तुळस लावलेली असते. खेडेगावात तर तुळशी वृंदावन असते. शहरी भागात जागेच्या अभावामुळे तुळशी वृंदावन पाहायला मिळत नाही.
तुळशीची नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते. तुळशीला रोज पाणी वाहले जाते, हे सर्व केले तरी तुळस लवकर वाढत नाही. काही जणांची तुळस तर लवकरच सुकून जाते. बऱ्याचदा तुळशीची पाने मोठी होत नाहीत ती छोटीच राहतात.
मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुळशीवर ज्या मंजुळा ( बीज ) येतात त्या सुकण्याच्या आधीच तुम्हाला काढून टाकायच्या आहे. त्या मंजुळा सुकून गेल्यावर गळू न पडतात आणि तुळशीच्या रोपाला हानी पोहोचवतात. म्हणून नेहमी लक्षात असुद्या कि बियांना सुकण्याआधीच काढायचे आहे.
तुमची तुळस जर वाढत नसेल तर रोज रोज पाणी घालू नका. जेव्हा तुळशीची माती सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी घाला. जास्त प्रमाणात पाणी घातल्याने तुळशीची मुळे ओली राहून सडत जातात. त्यामुळे तुळशीची वाढ पूर्ण पणे थांबते.
मित्रांनो चला तर मग जाणून घेऊ आपली तुळस बहारदार व्हावी यासाठी नक्की कोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे.
इप्सम मिठाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हो इप्सम मीठ हे तुळस वाढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्याचा वापर दोन पद्धतीने करू शकतो. मीठ पाण्यात मिसळून ते पाणी तुळशीच्या पानांवर स्प्रे करू शकता किंवा एक चमचा इप्सम मीठ घेऊन ते खोडाला किंवा मातीत सोडू शकतो. मित्रांनो हे इप्सम मीठ आपल्याला कोणत्याही शेती विषयक दुकानात मिळेल.
लक्षात ठेवा स्प्रे करत असाल तर एक लिटर पाण्यात एक चमचा इप्सम मीठ घ्यायचे आहे. जास्त घ्याल तर पाने पिवळी पडून जाळून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पाण्यात मीठ मिक्स झाल्यानंतर पाच मिनिटांने स्प्रे करू शकता. लक्षात असुद्या जर तुम्ही तुळशीची पाने नित्य नियमाने खात असाल तर पानांवर स्प्रे करू नका, डायरेक्ट माती मध्ये मीठ सोडा. दोन ते तीन दिवसांतच तुम्हाला फरक उघड्या डोळ्यांनी दिसेल.
तुमच्याही तुळशीची वाढ थांबली असेल तर एकदा नक्की हा उपाय करून पहा.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.