नमस्कार मित्रांनो,
मित्रानो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचे दिवस संपण्यात वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्यासाठी पुरेशी असते. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
उद्या कोजागिरी पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे.
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.
मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कोजागिरी पौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात.
कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. ज्योतिषानुसार या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांनी युक्त असतो. मान्यता आहे कि या दिवशी आकाशात अमृतवर्षा होते. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो आकाराने नेहमीपेक्षा मोठा दिसतो.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाची खीर बनवून ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवली जाते. मान्यता आहे कि हि खीर खाल्ल्याने मनुष्याला आरोग्याची प्राप्ती होते. या रात्री पडणाऱ्या चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि विशेष म्हणजे चांदीच्या भांड्यामध्ये हि खीर बनवून चांदीच्या भांड्यात रात्रभर ठेवणे अतिशय उत्तम मानले जाते.
उद्या आश्विन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 19 ऑक्टोबर रोज मंगळवार सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने बहरून येणार आहे. जीवनातील दुःखाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुखाच्या सुंदर प्रकाशाने आपले जीवन प्रकाशमय होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्र आणि करियर मध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाईक करा.