नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो माधुरी दीक्षित बद्दल तुम्हाला नव्याने सांगायची काहीच गरज नाही. कारण माधुरीने आजवर तिच्या मेहनतीच्या जोरावरच एवढं काही मिळवलं आहे. माधुरी ज्यावेळी चित्रपटात कामे करायची तेव्हा एकापेक्षा एक हिट चित्रपट तिने दिले आहेत.
बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत माधुरीने काम केले आहे. माधुरीने 1988 मध्ये आलेल्या अबोध या चित्रपटातून आपल्या करियर ची सुरुवात केलेली. आपला डा न्स, अभिनय, अदा यांच्यामुळे माधुरी अल्पावधीतच टॉपच्या अभिनेत्रींनमध्ये शामिल झाली होती.

आजही कित्येक जण माधुरीच्या अदांचे दिवाने आहेत. मित्रांनो आज आपण माधुरीच्या कुटुंबाबद्दल, तिच्या मुलांबद्दल माहिती घेणार आहोत. आजवर माधुरीच्या मुलांना खूप कमी वेळा पाहिलं गेलं आहे. ते सहसा मीडि याच्या कॅमेऱ्याच्या नजरेस पडत नाहीत. असं असलं तरी सामान्य लोकांच्या मनात तिच्या मुलांच्या विषयी कुतूहल आहे.

मित्रांनो अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत माधुरी दीक्षित ने 17 ऑक्टोबर 1999 ला लग्न केलं. लग्नानंतर आपल्या करोडो फॅन्स ना सोडून माधुरी अमेरिकेला निघून गेली.
माधुरी आणि श्री राम नेने यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव एरिन नेने आणि लहान मुलाचं नाव रायन नेने असं आहे. माधुरी प्रमाणेच तिची दोन्ही मुलं सुद्धा सुंदर आहेत. ही दोन्ही मुले अमेरिकेतील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.

अनेक कलाकारांच्या मुलांप्रमाणे माधुरीची मुलं सुद्धा चित्रपटात पदार्पण करणार का अस प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. मित्रांनो तुम्हाला या बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.
मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच आणखी घडामोडी रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.