असा असतो ऑक्टोबर मध्ये जन्म घेणाऱ्या लोकांचा स्वभाव… जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या जन्माचा महिना तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगतो. स्वभावातील अनेक रहस्य आपण जाणून घेऊ शकतो. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक सौंदर्य प्रेमी आणि अतिशय आकर्षक असतात. या महिन्यात जन्मलेले लोक नाजूक स्वभावाचे असतात, परंतु ते उघडपणे कोणाशीही आपले मन लगेच मोकळे करत नाहीत.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक सुंदर आणि आकर्षक दिसतात. ते नेहमी तरुण दिसतात. बालपणात त्यांचे सौंदर्य जेमतेम असले तरी जसजसे वय वाढते तसतसे त्यांचे सौंदर्यही वाढते. ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक बोलण्याच्या कलेत पारंगत असतात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या आजूबाजूला नेहमीच लोकांचे गर्दी असते. प्रत्येक गोष्ट सहजतेने करणे ही यांची खासियत आहे.

हे लोक बोलताना अशा शब्दांच्या निवड करतात कि समोरच्या लोकांवर लगेच परिणाम होतो. हे लोक संभाषण कौशल्यांनी समृद्ध असतात ते त्वरीत संकटातून बाहेर पडण्यास सक्षम असतात. योग्य वेळी योग्य मार्गाने मत मांडण्यात यांचा हात कोणीच पकडू शकत नाही.या महिन्यात जन्मलेले लोक राजकारण, कला, तंत्रज्ञान, अभिनय, व्यवसाय किंवा वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करतात.

या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या असतात त्यामुळे यांना जो कोणी व्यक्ती भेटतो तो सुद्धा प्रसन्न होतो. या व्यक्ती आपल्या कुटुंबाची नेहमी काळजी घेतात. तसेच एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असेल तरच समोरच्या व्यक्तीला सल्ला देतात.

या व्यक्तीना काल्पनिक जीवन जगणे आवडत नाही यांना प्रॅक्टिकल जीवन जगणे पसंद असते. हे लोक लगेच लोकांना प्रतिक्रिया देत नाहीत. यांच्याकडून शिकण्या सारखे म्हणजे प्रगती कशी करावी? जीवनात पुढे कसे जावे ? नेहमी सकारात्मक कसे राहावे या गोष्टी शिकण्यासारख्या असतात.

यांना कुठे काय बोलायचे आणि कुठे काय नाही बोलायचे याचे प्रचंड नॉलेज असते. सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन स्वतःला पटेल तेच या व्यक्ती करतात. या महिन्यात जन्मलेले लोक स्वछता प्रिय मानले जातात. यांना आपले घर, परिसर, ऑफिस मध्ये बसतो ती जागा इत्यादी गोष्टी स्वच्छ हव्या असतात. घाणेरडे पणा यांना अजिबात खपत नाही.

या व्यक्ती निर्णय घेताना घाई करत नाहीत. अगदी शांत राहून विचार करून मगच निर्णय घेतात. यांना राग बऱ्यापैकी येतो पण तितक्याच लवकर तो राग शांत देखील होतो. कोणत्याही संकटातून , अवघड परिस्थिती मधून बाहेर कसे पडायचे हे यांना माहित असते.

या महिन्यात जन्मलेल्या लोकांवर माता सरस्वतीची नेहमीच कृपा दृष्टी असते. या व्यक्ती घरात कसेही असले तरी बाहेर मात्र यांचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. यांचा प्रेमभंग झाला तरी सुडाची भावना न ठेवता माफ करण्यावर जोर देतात.

ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा शुभ अंक म्हणजे 2, 6, 7, 8 शुभ दिवस मंगळवार, गुरुवार व शुक्रवार. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यात यांना काहीच हरकत नाही. शुभ रंग – पिकॉक ग्रीन.

या महिन्यात जन्मलेल्या लोकांना सल्ला असा आहे कि आपल्या ध्येया प्रति समर्पित राहावे. या लोकांनी गोर गरिबांना शालेय उपयुक्त वस्तू म्हणजेच स्टेशनरी भेट म्हणून देऊ शकता. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी देवीची उपासना करावी. लक्ष्मी, दुर्गादेवी, पार्वती किंवा अन्य कोणती देवी यांची उपासना जरूर करावी.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *