पाल जमिनीवरून चालणे, घरात असणे कोणते संकेत आहेत

0
59

नमस्कार मित्रांनो,

साधारणपणे सर्वांच्याच घराच्या भिंतीवर पाल असते. पाल असणे शुभ असते कारण तिला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. परंतु विषाशी असल्याने ती कशात पडेल व घरातील सदस्यांना विषबाधा होईल म्हणून आपण घाबरतो व पाल घरात दिसल्यास तिला बाहेर काढतो. परंतु पाल घरातील जीव जंतू किडे कीटक खाते व आपले घर किटकांपासून मुक्त करते. म्हणून ही पाल घरात असणे चांगले असते.

कधी कधी आपल्या अंगावर अचानक पाल पडते व घरातील जेष्ठ व्यक्ती आपल्याला लगेचच अंगावर पाणी शिंपडण्यास सांगतात. ते असे का सांगतात? हे आपल्याला माहीतच नसते. परंतु त्यांनी सांगितले की, आपण लगेच अंगावर पाणी शिंपडतो. पाल जर आपल्या अंगावर पडली तर ती कोणत्या भागावर पडली आहे त्यावर त्याचे शुभ व अशुभ फळ मिळते.

पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडल्यास शुभ फळ देते व कोणत्या भागावर पडल्यास अशुभ फळ देते हे आता बघणार आहोत. जर आपल्या कपाळावर पाल पडली तर आपल्याला धन लाभ होण्याची शक्यता असते. जर केसांवर पाल पडली तर असे समजावे की, खूप मोठे संकट आपल्यावर येणार आहे. जर डाव्या कानावर पाल पडल्यास असे समजावे की आपल्याला काहीतरी दागिने मिळणार आहेत.

जर उजव्या कानावर पाल पडली तर असे समजावे की, आपले आयुष्य वाढले आहे. म्हणजे जर काही दुर्घटना झाली असेल किंवा काही मोठा आजार झाला असेल यातून आपण सुखरूपपणे बाहेर पडणार आहोत. आपल्या मानेवर पाल पडली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते. जर आपल्या हातावर पाल पडली तर असे समजावे की धनलाभ होणार आहे.

आणि जर पाल आपल्या पायावर पडली तर कोठेतरी तीर्थस्थान किंवा शुभ ठिकाणी यात्रा घडणार आहे. आपण फिरायला जाणार आहोत. जर पाल संबंध करताना दिसल्यास असे समजावे की, आपले जुने मित्र मैत्रिणीशी आपली भेट होणार आहे. जर 2 पालीचे भांडण होत असेल तर म्हणजे त्या भांडताना दिसल्यास असे समजावे की, आपल्या प्रियजनांपासून आपण वेगळे होणार आहोत किंवा काहीतरी दुःखद बातमी ऐकायला येऊ शकते.
तर हे आहेत ते संकेत.

– कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here