नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्त्री आणि पुरुष यांचे गुण वेगवेगळे असतात. या शक्तींच्या आणि गुणांच्या आधारेच ते आपापली कार्य पार पाडत असतात. आचार्य चाणक्य चाणक्य नीतिमध्ये म्हणतात की राजा, ब्राह्मण आणि स्त्री हे कोणत्याही देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम करत असतात.
मित्रांनो या तिघांची शक्ती, खरी ताकद कोणत्या गोष्टीमध्ये आहे याचं वर्णन ते चाणक्यनीति मध्ये करतात. आजच्या काळामध्ये राजा म्हणजेच देशाचे पंतप्रधान, ब्राह्मण म्हणजेच ज्ञानी लोक आणि स्त्रिया.
या ठिकाणी खरी शक्ती कशामध्ये आहे याचं वर्णन करताना आर्य चाणक्य म्हणतात, राजाची खरी ताकद ही त्याच्या बलशाली असण्यामध्ये आहे. राजाकडे मोठे सैन्य असेल अधिक मोठा फौजफाटा असेल मात्र राजा जर बलशाली नसेल, तो स्वतः ताकदवर नसेल तर त्याचं कोणीही ऐकणार नाही. म्हणून राजांनी स्वतः बलशाली, ताकदवार असणंही फार महत्त्वाचं असतं. त्याची खरी ताकद ही त्याच्या बलशाली असल्यामुळे असते.
मित्रांनो दुसरी गोष्ट, ब्राम्हण म्हणजेच ज्ञानी लोक. ज्ञानी लोकांची खरी ताकद ही त्यांच्या ज्ञानामध्ये असते, त्याला मोठा माणूस बोललं जातं. असा माणूस त्याच्या चातुर्याने अगदी काहीही करू शकतो. आणि हीच ब्राह्मणांच्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट असते.
तिसरी गोष्ट, या बाबतीत चाणक्य म्हणतात की स्त्रीची खरी ताकद ही तिच्या सौंदर्यामध्ये आणि यौवन, म्हणजेच जवानी मध्ये असते. यौवणा च्या बळावर स्त्री अवघडात अवघड काम अगदी सहज करू शकते.
अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. त्याचबरोबर चाणक्य म्हणतात की जी स्त्री सुंदर नसते, ज्यांच्याकडे सौंदर्य कमी असतं ती स्त्री आपल्या मधुर वाणीने म्हणजेच आपल्या गोड बोलण्याने समोरच्या कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करू शकते. बोलण्यात मग्न करून ठेवण्याची तिची ताकद असते. म्हणजे स्त्रीकडे ती शक्ती असते, तिची सुंदरता आणि तिच्याकडे असणार गोड बोलणे म्हणजेच मधुर वाणी होय.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.