आज 11 सप्टेंबर ऋषीपंचमी… झोपण्यापूर्वी एकदा वाचा ही कथा… भाग्य चमकेल…

नमस्कार मित्रांनो,

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषी पंचमी  व्रत साजरे केले जाते. यंदा ऋषी पंचमी 11 सप्टेंबर रोजी आहे. ऋषी पंचमी हा हिंदू धर्मात एक शुभ उत्सव आहे. श्रद्धेनुसार हा दिवस भारतातील ऋषीमुनींचा सन्मान करण्यासाठी विशेष आहे.

मित्रांनो ऋषी पंचमीचा शुभ सण प्रामुख्याने सप्तर्षींना समर्पित आहे. धार्मिक कथांनुसार, हे सात ऋषी म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाजा हे आहेत.

अशीही मान्यता आहे की ऋषी पंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे भाग्य एका क्षणात बदलते आणि भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.

ऋषी पंचमी व्रत विधी.

ऋषी पंचमीच्या दिवशी घर स्वच्छ करा. देवघरात देखील विशेषकरून स्वच्छता करा. सात ऋषींसोबतच देवी अरुंधतीचीही विधीवत स्थापना करा. हळद, चंदन, फुले, अक्षता इत्यादींनी सात ऋषींची पूजा करा. पूर्ण विधीवत पूजा केल्यानंतर ऋषी पंचमी व्रत कथा ऐका. शेवटी ब्राह्मणांना भोजन देऊन व्रताचे उद्यापन करा.

ऋषी पंचमी पूजा मंत्र

कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।

मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते.

‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

मित्रांनो या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते.

महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ भाजी या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. अपेक्षा आहे तुम्हाला ऋषिपंचमी बद्दल मिळालेली माहिती नक्की आवडली असेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *