क्रोध अनावर होतो ? राग येतो ? स्वामींचा हा संदेश तुम्हाला शांत करेल

0
57

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो नमस्कार,

स्वामी महाराज नळदुर्ग मध्ये असताना तेथे रामेश्वरवरून एक पुराणिक आला होता. तो खूप विद्वान होता त्याला गायन कला सुद्धा अवगत होती. वीणा वाजवून तो पुराण सांगत असे. नळदुर्गमध्ये आपले पुराण व्हावे म्हणून त्याने भरपूर प्रयत्न केले, परंतु सर्व नळदुर्गवासी स्वामींच्या अगण्य भक्तीत रममाण झाले होते. म्हणून या महाशयांची काही डाळ शिजलीच नाही.

आधीच ज्ञानाची अहंकार त्यात तेथील लोक स्वामींचे अनन्य भक्त आणि यातच त्याला कोणीच महत्व दिलं नाही हे सर्व बघून तो रागाने फणफणला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली, आणि एखाद्या भमिष्ठा सारखा स्वामींची नकोनकोती ती निंदा करू लागला. हा सर्व प्रकार स्वामींच्या लक्षात आला. एके दिवशी स्वामि महाराज निवांत बसलेले असताना सभोवती पुष्कळ सेवेकरी मंडळी जमलेली होती.

तेव्हा हे महाशयसुद्धा तेथेच बसलेले होते आणि बाबांनी अरे बाबांनो ! ह्याचा चित्तभ्रम झाला आहे. तुम्ही ह्याचा पुराण श्रवणाचा कार्यक्रम करून त्याला धन देऊन शांत करा. स्वामी भक्त हो स्वामी महाराज आई आहे. स्वामींना सर्वच भक्त बाळा सारखे आहेत. भलेही तो भरकटलेला का असेना स्वामींचे सर्वांवर सारखेच प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी सर्वांना त्याचा पुराण श्रवणाचा कार्यक्रम करा असा हुकूम दिला.

स्वामींचा असा हुकूम होता की जमलेल्या व्यक्तींना काहीच पर्याय नव्हता.परंतु त्या सर्व मंडळींनी त्या दुराचारी बुवाकडे बघून तोंडे मुरडली, आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करण्याचे ठरविले. एकडे स्वामींनी असे ठरवता बुवा मात्र लाजले. हे पुराण सांगणे वगैरे सर्व प्रकार आपण धंदा म्हणून करतो. पैशासाठी करतो आणि आपल्याला कोणी महत्त्व दिले नाही, आपला अहंकार दुखावला गेला म्हणून आपण स्वामींचा द्वेष केला.

स्वामीना विनाकारण त्रास दिला असा पछाताप त्याला झाला.आणि स्वामी महाराज तर परमेश्वर आहेत. निर्विकार आहेत ते निंदक व दुर्जन लोकांना माफ करून त्यांच्यावर कृपा करतात असा विचार करून स्वामींच्या चरणी लोटंगण घातले. पुढे स्वामी त्याला उरला सुरला अहंकार देखील नष्ट करतात. स्वामी भक्त हो आता दुसरा दिवस उजाडला. पुराण कथनाचा कार्यक्रम सुरू होता.

या कार्यक्रमाला स्वतः ही स्वामींची हजेरी लावली होती. बुवांनी ‘ अपुत्रस्य गतीनोस्ती’ या विषयावर पुराण कथन सुरू केले, आणि निपुत्रीकास गती नाही असे काहीतरी प्रवचन करू लागले. त्या महाशयांना असे बोलणे सुरू असताना स्वामीना क्रोध अनावर झाला. आणि महाराज चांगलेच खडसावत बोलू लागले की अरेरे काहीही बडबडू नकोस.

पोकळ पंडितांच्या गप्पा मारत. लोक मनोरंजनचा कार्यक्रम करू नकोस. पुत्रावाचून मोक्ष नाही हे तुला कोणी सांगितलं? पोपटाला पुत्र आहे का? वामदेव व्यासांना पुत्र होते का? तू देखील निपूत्रीक आहेस. हे विसरू नकोस आणि म्हणून तू अधोगतीला जाशील काय? येथे परमेश्वराचे गुणगान करण्याचे सोडून भलते सलते काय बड बडतो आहेस.

पुत्रापासून बापाला मोक्ष प्राप्ती होते. असे जर खरे असेल तर कुत्र्या, मांजरांना माणसापेक्षा जास्त पुत्र होतात. मग त्यांना कधीच मोक्ष भेटायला हवा. स्वामी भक्त हो प्रत्यक्ष परब्रम्हच्या मुखी निघालेले हे अमृतवचन ऐकल्यानंतर बुवाचा ताठा थाट अक्षरशः उतरून गेला आणि घाईघाईने आपले पुराण उरकले आणि जाऊन स्वामींचे चरण पकडले, आणि बोलू लागला स्वामी मला क्षमा करा.

<
मी मूर्ख आहे, मी तुमचा बाळ आहे,आपल्या बाळाने कितीही अपराध केले तरीही शेवटी आई त्याला माफ करतेच. स्वामी मला क्षमा करा मी मादक सेवन करून वीणा वाजवून लोकरंजन करून पैसा मिळवतो. परंतु माझ्या तामसी धामभीक वृत्तीचा लोक कंटाळा करतात. तरी मजबूर कृपा करा आणि मला उत्तम गती प्रदान करा असे बोलून बुवा चोळप्पाकडे गेला.

आणि स्वामींनी पोपट आणि विणा वाला असा उल्लेख कोणासाठी केला असे विचारतो. तेव्हा पोपट म्हणजे शुक्राचार्य आणि विणा वाला म्हणजे नारदमुनी असे स्वामीच्या बोलण्याचा अर्थ आहे असे त्यांनी सांगितले. आणि संत, महंत, भक्त, पंडित हे निपुत्रिक असताना सुद्धा मोक्ष पदास प्राप्त झाला.इतकेच नव्हे तर त्यांनी विश्वाला तारले असे ही सांगितले.

स्वामी भक्त हो इतके सर्व घडल्यानंतर बुवा पूर्णपणे शांत झाले. त्यांचा उरला सुरला अहांकर पूर्णपणे उतरला तो स्वामींचा अन्यन भक्त झाला. स्वामींची मनोभावे सेवा करू लागला. योगायोगाने त्याच्या ५० वर्ष असलेल्या पत्नीस पुत्रप्राप्ती होऊन स्वामी कृपेचे त्याला अनुभूती झाली. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी महाराज आपल्याला दैनदीन जीवनात सभोवताली लोकांमध्ये असलेल्या अहकरासोबत कसा वार्तालाप करायचा याची कला शिकवत आहेत.

स्वामी भक्त हो सर्वप्रथम अहकार म्हणजे हे जाणून घेऊया.जसे समुद्रात लाटा येतात अगदी तसेच एकाच परमचैतन्यत जे लाटेचे स्वरूप धारण केले. त्याला आत्मा असे म्हणतात. परंतु हा आत्मा जेव्हा मानव शरीर धारण करतो तेव्हा त्याच्या मुलस्वरुपाला विसरतो आणि तो स्वतःला शरीर समजू लागतो. इतरापेक्षा मी वेगळा आहे. चुकीच्या धारनेत तो अडकतो आणि याच अज्ञानाला मूळ अहंकार म्हटले जाते.

इतकेच नव्हे तर पुढे हा मूळ अहंकार अजून खोट्या अहकरांचे रूप धारण करतो जसे मी श्रेष्ठ आहे. बाकीचे कनिष्ठ आहेत. मी ज्ञानी आहे. इतर अज्ञानी आहेत व वैगरे आणि आज पर्यंत जे जे स्वामिचे अवतार झाले, संतमंडळी झाली. त्यांनी मानवाच्या याच मूळ अहंकारावर घाला घालण्यासाठी काम केलं.असो थोडक्यात आपण सर्व एकाच सागराच्या लाटा आहोत.आपण सर्व एकाच परमचैतन्यचे अंश आहोत.

या परम सत्याचा विसर पडून मी कोणीतरी वेगळा आहे. या खोट्या नादात हा खोटा अहंकार स्वतःला मिरवत असतो. आणि जेव्हा त्याचे रूपांतरण इर्षा, द्वेष, लोभ, टीका करणे वैगरे गोष्टीत होते आणि या सर्व प्रकरासोबत कसे वागायचे याची कला स्वामी आपल्याला शिकवत आहे. बघा स्वामिमध्ये स्वामी अतिशय नेमका शब्दात सौम्यपणे बोलून बुवांच्या खोट्या अहकरावर घाव घालून क्षणात पाणी केले.

म्हणून आपण आजच्या पिढीसाठी लीलेतून बंध घेता. आपल्याला संवाद कौशल् विकसित करण्याची कला अवगत करायची आहे. आपल्या बोलण्याने समोरील व्यक्तीच्या अहकार डीचवला जाऊन तो मोठा होतो की तो अहांकारचे पाणी होऊन त्यामागे परमचैतन्य प्रगट होते. याचे आत्मपरीक्षण करायचे आहे. आपल्याला सयंम ठेवून जागृत राहून वर्तमानात राहून जेव्हा आपण नम्रतेवणेने वार्तालाप करतो.

तेव्हा नीच्छितच समोरील माणसातील अहंकार विलीन होतो जेव्हा आपला इच्छित कार्यभाग साधला जातो.चला तर मग आज आपण स्वामींना प्राथना करूया. हे समर्थ जसे समुद्रात उसळणारी लाट. त्या समुद्राचा अविभाज्य भाग आहे.अगदी तसे आम्ही सर्व तुमच्याच असीम अनंत स्वरूपाचे अंश आहोत, तुमचेच बाळ आहोत.

ही छान समज तुम्ही दिली. तुम्हाला धन्यवाद.तुमच्यापासून स्वतःला वेगळं समजणं हा मूळ अहकार आहे. ही समज दिली. तुम्हाला धन्यवाद. आणि नम्रतेचा शक्तीने ह्या अहांकरवर कधी मात करायची ह्याची कला आम्हाला शिकवली.

स्वामी बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्त वसल्या भक्तभिमनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here