श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दलची दुर्मिळ माहिती…स्वामी भक्तांनो नक्की वाचा…

0
70

श्री स्वामी समर्थ.
स्वामींचा प्रकटकाल इ.स.१८५६-१८७८ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक संत होते. श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्री दत्तात्रेयाचे तिसरे ते पूर्णावतार मानले जातात.

गंगापूर चे नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ या नावाने प्रकट झाले. अशीही बऱ्याच भक्तांची भावना आहे. मी नरसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वन मधून आलो आहे.

हे स्वामींच्या तोंडातील उद्गार हे नरसिंह सरस्वती चा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले. अंदमानातील कर्दळी वना तून प्रकटले.

अशी मान्यता प्रचलित आहे. तेथून त्यांनी असेतू हिमाचल भ्रमण केले. श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली.

त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरात आले. त्यानंतर मंगळवेढे गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. व तेथील भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.

भेटेल त्याला आपल्या लीलेने दुःख मुक्त केले. इ.स.१८५६ स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

इ .स. १८७८ अनेकजणांना कार्यरत करून त्यांनी त्यांचा आविष्कार संपविला. आता सुद्धा स्वामी भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना कार्यरत करत असतात.

अनंत काळापर्यंत करत राहतील अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा आहे. रविवार दिनांक ३० एप्रिल १८७८ रोजी ( चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०० बहधाण्या संवतासर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यान काली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.

स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्त करण्यात आले. भक्तांनी त्यांना ज्या स्वरूपात पाहिले त्या स्वरूपात दर्शन दिले आहे.

<
कोणाला विठ्ठल स्वरूपात,कोणाला विष्णू स्वरूपात, कोणाला भगवती स्वरूपात भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत.
संप्रदाय = दत्त संप्रदाय
भाषा = मराठी
कार्य = महाराष्ट्र व कर्नाटक येथे दत्त संप्रदाय चा प्रसार
प्रसिद्ध वचन = भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
संबंधित तीर्थक्षेत्रे = अक्कलकोट, गंगापूर.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here