सारखं तोंड येत असेल तर हे 3 उपाय कराच… तोंड येण्याचा त्रास कायमचा होईल दूर…

नमस्कार मित्रांनो,

आजची सर्वसाधारण समस्या जी फक्त उन्हाळ्यात नव्हे तर इतर वेळी सुद्धा डोकावते ती म्हणजे तोंड येणे. आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा सतत गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांना तोंड येते. तसेच असंतु लित आहार, पोट खराब असणे, पान मसा ल्याचे सेवन, यामुळे सुद्धा  तोंड येते.

तोंड येणे म्हणजेच तोंडामध्ये फोड येणे. यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आणि पिताही येत नाही. काही लोकांना गालाच्या आतील बाजूस, तर काही जणांना टाळू वरती तर काही लोकांना जिभेवरती हे फोड येतात. मित्रांनो ही समस्या इतकी त्रस्त करते की आपल्याला खाता पिता तर येतंच नाही शिवाय कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी आपण घरगुती उपाय जर केले तर आपल्याला थोडा आराम मिळू शकतो.

आलेलं तोंड बर होणे, तोंड आलेल्या वेदना कमी करणे व पुन्हा ते येऊ न देण्यासाठी आपण हा उपाय नक्की करू शकतो. मित्रांनो हा अतिशय चांगला घरगुती उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे.

आपल्या घराच्या आसपास जाईचं झाड असते, तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा एक अत्यंत चांगला उपाय आहे. आपल्याला या उपायासाठी जाईची 5-6 पाने स्वच्छ धुवून चघळायची आहेत. ही पाने चघळताना त्या पानांचा रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

मित्रांनो हा रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. यामुळे तुम्हाला सुमारे 90 टक्के फरक पडतो. तसेच तुळसीची दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या.

लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने सुद्धा आराम मिळतो. सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा. त्यासोबत जिरे चावून खाल्ले तरीही गुणकारी ठरते. हे इतर काही उपाय आहेत.

अजून एक उपाय तुम्ही तोंड आल्यावर करू शकता तो म्हणजे  एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.

हा उपाय तुम्ही तोंड आल्यावर करू शकता. जर पुन्हा तोंड येऊ नये असं वाटत असेल तर काही घरगुती टि प्स आहेत ज्या तुम्ही वापरू शकता.

सर्वात पहिली टीप म्हणजे टोमॅटो. जर रोजच्या आहारात कोणत्याही प्रकारात अथवा कच्चा असेल टोमॅटो तुम्ही खायला हवाच. टोमॅटो रोज खाल्ल्याने तोंड येत नाही. याच सोबत पाणी भरपूर प्यावे. यामुळे पोट साफ होऊन तोंडाला आराम मिळेल. परंतु पाणी पिताना कधीही उभे राहून पिऊ नये, खाली बसून घोट घोट सावकाश प्यावे ज्यामुळे शरीराला फायदा होतो. पुन्हा तोंड येत नाही.

त्याच बरोबर खूप गरम पेय, अतिशय  गरम पदार्थ तुम्ही कधीच खाऊ नका, अतिशय चट कदार, मसाले पदार्थ, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा. ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीच तोंड येणार नाही.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. हॅशटॅग मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *