नमस्कार मित्रांनो,
महाशिवरात्र हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो.
महाशिवरात्रीला भक्तांकडून काही गोष्टी आवर्जून केल्या जातात. कोणत्या आहे त्या गोष्टी चला आपण जाणून घेऊया. अशीही मान्यता आहे की, या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमाम गुणांचे ते प्राशन करतात.
पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्रि हा दिवस महादेवांचा सगळ्यात आवडता दिवस असतो. या वेळी मंगळवारी 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रीला भगवान शंकरांची पूजा केली जाते.
या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो हे खरं, एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रूप धारण केले होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या ग्रहणात महादेवांचा जागर केला जातो भगवान शंकरांना बेलपत्र रुद्राक्ष प्रिय आहेत. म्हणून ते त्यांना अर्पण केले जातात. या दिवशी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. बेलपत्र, पांढरी फुलं, आंबा याच्या पत्री, भस्म अर्पण केले जाते.
काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त 3:16 मिनिटांपासून सुरू होईल आणि बुधवारी म्हणजे 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा संध्याकाळी सहा वाजून 22 मिनिटांनी ते रात्री 12:33 मिनिटांनी पर्यंत केली जाईल.
शिवरात्रीच्या 4 प्रहर पूजा केली जाते. महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा विधीची वेळ पाहूया. पहिला प्रहर म्हणजे 1 मार्च 2022 संध्याकाळी 6:21 मिनिटांपासून ते रात्री 9:27 मिनिटांपर्यंत, दुसरा प्रहर 1 मार्चला रात्री 09:27 मिनिटं ते 12:33 मिनिटांपर्यंत.
तिसरा प्रहर 1 मार्चला रात्री 12:33 मिनिटांपासून ते पहाटे 3:39 मिनिटांपर्यंत आणि चौथा प्रहर असेल 2 मार्चला पहाटे 3:39 मिनिटांपासून ते सकाळी 6:45 मिनिटांपर्यंत या व्रताचा शुभमुहूर्त 2 मार्च 2022 बुधवारी संध्याकाळी 06:46 मिनिटांपर्यंत असणार आहे.
कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.