अशी मान असणाऱ्या व्यक्ती असतात अत्यंत भाग्यशाली…

नमस्कार मित्रांनो,

तुमच्यापैकी अनेकांनी देहबोलीबद्दल म्हणजेच बॉडी लँग्वेज बद्दल ऐकले असेल. हे एक शास्त्र आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे त्या बद्दल ओळखले जाऊ शकते. तसेच भारताच्या प्राचीन शास्त्रांमध्ये देखील याचा उल्लेख आहे कि शरीराच्या हावभावांसह, शरीराच्या अवयवांची रचना देखील व्यक्तीबद्दल बरीच माहिती देत असते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या गळ्याच्या लांबी, जाडी यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे जाणून घेऊ शकता. सग व्यक्ती भाग्यवान आहे की नाही हे देखील जाणून घेऊ शकता.

सरळ मान

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांना सरळ मान असते त्यांना स्वाभिमानी समजले जाते. असे लोक स्वतःची ओळख स्वतः बनवतात. त्यांना कोणाचीही मदत घेणे आवडत नाही, ते स्वतःच्या नियमांनुसार जीवन जगत असतात. हे लोक खूप चांगले मित्र म्हणून नाव कमावतात व प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या मित्रांना समर्थन देतात.

आदर्श मान

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांच्या गळ्याची लांबी आणि रुंदी समान आहे ते लोक बरेच आदर्शवादी असतात. असे लोक नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी पुढे येतात. असे लोक मेहनत करण्यापासून कधीच पळ काढत नाहीत. त्यांना लोकांशी जुळवून घेण्यास वेळ लागत नाही. तथापि, कोणी आपल्यावर उपकार करावेत हे यांना अजिबात पटत नाही.

वक्र मान

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांची मान वाकडी असते ते लोक त्यांच्याच विचारांमध्ये हरवलेले असतात. या व्यक्तींना स्वतःचे विचार व्यक्त करण्यात सतत अडचण येत राहते. परिणामी ते लोकांचा विश्वास पटकन जिंकत नाहीत. हे लोक फिरण्यात पटाईत असतात. तथापि यांनी जर मेहनत केली तर जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

लहान मान

ज्या लोकांची मान सामान्य आकारापेक्षा लहान असते असे लोक अत्यंत सरळ मानले जातात. हे लोक कमी बोलणारे असून मेहनती असतात. ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि कोणावरही सहज विश्वास ठेवतात. हे लोक मौजमस्ती करणारे आणि दिलेला शब्द पाळणारे असतात. त्यांची नम्र वृत्ती लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. परंतु बरेच लोक यांना फसवू शकतात.

पातळ मान

ज्यांची मान पातळ आहे असे लोक आळशी असल्याची मान्यता आहे. यांच्या अंगी खूप आळस दिसून येतो. त्यामुळे हे लोक लवकरच छोट्या छोट्या आजारांच्या हाती सापडतात. हे लोक कमी महत्वाकांक्षी असतात आणि त्यांना जास्त बोलायला आवडत नाही. तथापि या लोकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज योगा आणि व्यायाम केला तर जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो.

मान खाली घालून चालणारी व्यक्ती

सामुद्रिक शास्त्रानुसार मान खाली वाकवून चालणारी व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. नशीब अशा लोकांना पूर्णपणे साथ देते. त्याचबरोबर या व्यक्ती कोणतेही काम करण्यात अजिबात संकोच करत नाहीत. या व्यक्तींना प्रत्येक काम उत्साहाने करायला आवडते. अशी मान असणारे लोक पटकन यश मिळवतात.

लवचिक मान

ज्या लोकांची मान लांब आणि लवचिक असते, सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक कलेचे प्रेमी मानले जातात. असे लोक अष्टपैलुत्वाने समृद्ध असतात. तसेच, ते अतिशय उदार आणि शांत स्वभावाचे मानले जातात. यासह, त्यांचे वर्तन देखील खूप चांगले असते आणि ते त्यांचे जीवन आनंदाने जगतात.

आवश्यकतेपेक्षा जास्त लांब मान

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांची मान आवश्यकतेपेक्षा जास्त लांब असते असे लोक सत्याच्या मार्गावर चालतात. त्यांना त्यांच्या कष्टाच्या आधारावर प्रत्येक भौतिक गोष्टीचा आनंद मिळतो. या व्यक्ती जे काही काम करतात ते गांभीर्याने आणि उत्साहाने करतात. हे लोक विश्वासार्ह असतात आणि त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो. अशी मान असणारे बुद्धिमान आणि शक्तीने समृद्ध असतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि सामुद्रिक शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *