या राशींना आपलं गुपित मुळीच सांगू नका…या राशींच्या पोटात काहीच राहत नाही…

0
62

नमस्कार मित्रांनो!!!

बऱ्याचदा अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला सांगीतल्या जात नाहीत कारण या गोष्टी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा घटक असतो. आपण काही गोष्टीआपल्या मित्रांना किंवा प्रियजनांना सांगतो जेणेकरून मनाचे ओझे कमी होईल आणि दुसरे म्हणजे त्यांचा सल्ला उपयुक्त ठरु शकेल.

परंतु काही लोकं असे असतात की जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपले गुपित सांगितले तर ते दुसऱ्याच क्षणी अजिबात संकोच न करताआणखी एखाद्या तिसऱ्याला सर्व सांगतात. त्यांना पोटातील गोष्टी पचविणे अवघड जाते आणि आपल्या खाजगी गोष्टी इतरांपर्यंत पोहचवतात. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले गेले आहे की अशा काही राशी आहेत, त्या राशीच्या लोकांना महत्वाच्या खाजगी गोष्टी कधीच सांगू नये. चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या …

मेष
मंगळांचा प्रभाव मेष राशीवर अधिक असतो, ज्यामुळे या राशीचे लोकं खूप उत्साह आणि उर्जात्मक जगतात. जर आपण त्यांच्याबरोबर काही महत्वाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर काहीवेळा ते उत्साहात आपल्या महत्त्वाच्या गोष्टी इतरांसमोर व्यक्त करतात. कधीकधी त्यांना पोटात काहीही पचविणे खूप अवघड होते, म्हणून ते इतरांसमोर आपले रहस्य देखील सांगतात. म्हणून या राशीच्या लोकांना महत्वाच्या गोष्टी सांगणे टाळावे.

मिथुन
मिथुन राशीवर बुध या ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीचे लोकं लवकर सर्वांमध्ये मिसळतात आणि मनमोकळं बोलायला लागतात. म्हणूनच, जर आपण या राशीच्या व्यक्तीशी संपर्कात असाल तर त्यांना आपले गुपित सांगू नये. कारण त्यांना गप्पा मारायला खूप आवडतं, यामुळे ते स्वत:चं असं खाजगी आयुष्यच ठेवू शकत नाहीत, समोरच्याला सर्वकाही उघडपणे सांगून टाकतात.

कर्क
कर्क राशीवर चंद्राचा मोठा प्रभाव आहे. यामुळे, या राशीचे लोक अतिशय चंचल स्वभावाचे आहेत. त्यांच्या चंचल स्वभावामुळे, कधीकधी ते इतरांसमोर ज्या गोष्टी सांगायच्या नसतात त्या महत्वाच्या गोष्टी सांगतात. त्या नंतर त्यांना देखील त्याचं दु: ख होतं, परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. म्हणूनच, या राशीच्या व्यक्तीशी जर तुमचे चांगले संबंध असतील तर तुम्ही त्यांना एखादी महत्त्वाची गोष्ट असेल तर ते सांगणे टाळावे.

तूळ
शुक्र ग्रहाचा तूळ राशीवर असलेल्या प्रभावामुळे या राशीचे लोकं संभाषणात फारच पटाईत असतात आणि प्रत्येकाला त्यांच्या बोलण्यात गुंतवतात आणि समोरच्या व्यक्तीकडून सर्व महत्त्वाच्या गोष्टी काढून घेतात. या राशीचे असे आहे की इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एखाद्या तिसऱ्याला सांगतात आणि जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत त्यांना शांतताही मिळत नाही. म्हणूनच, आपल्या महत्त्वाच्या गोष्टी या राशीच्या लोकांना सांगू नका.

धनू
बृहस्पति ग्रहाचा धनू राशीच्या व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो. यामुळे, एका क्षणात ते कोणालाही आपलंसं करतात. परंतु यांना बोलतांना विसर पडतो आणि जर त्यांना आपण आपलं गुपित सांगितलं असेल तर तेच ते तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला सांगून टाकतात. म्हणूनच, जर या राशीच्या लोकांशी आपले चांगले संबंध असतील तर आपण त्यांना महत्वाच्या गोष्टी सांगणे टाळावे, अन्यथा आपले रहस्य कधीही रहस्य राहणार नाही.

कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here